लेक अथियापेक्षाही भन्नाट आहे सुनील शेट्टीची लव्हस्टोरी!

On: January 24, 2023 5:05 PM
---Advertisement---

मुबंई | सुनील शेट्टीची (Sunil Shetty) लेक अथिया हिचा विवाहसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. अथिया आणि केएल राहुल (K.L Rahul) यांचा हा प्रेमविवाह आहे. मात्र या दोघांच्या लव्हस्टोरीपेक्षा सुनील शेट्टीच्या लव्हस्टोरीची सध्या चर्चा होत आहे. 31 वर्षापूर्वी सुनील शेट्टीने मना कादरीशी लग्न केलं आहे.

मना आणि सुनील यांची पहिली भेट नेपियन सी रोडवरील पेस्ट्री पॅलेसमध्ये (Palace) झाली होती. पहिल्या नजरेत सुनील शेट्टींना मना आवडली होती. त्यानंतर मनाच्या बहिणीशी संपर्क वाढवत सुनीलने मना पर्यंत जाण्याचा मार्ग निवडला. त्या दोघांची मैत्री झाली.

ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यांच्या दोघांचं रिलेशनशिप 9 वर्षांपर्यंत सुरु होतं. त्यानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला. 25 डिसेंबर 1991 साली मना कादरीशी सुनील शेट्टीनं लग्न (marriage) केलं. या दोघांचा विवाह अगदी थाटामाटात आणि हिंदू पद्धतीने झाला.

लग्नावेळी सुनील आणि मनाला त्यांच्या सांस्कृतिक फरकाबद्दल जाणीव होती. मना हीचे वडिल गुजराती मुस्लिम (Gujarati Muslims) तर आई पंजाबी हिंदू होती. सुनील हा देखील तुळू भाषिक होता. बाॅलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करण्यापूर्वी लग्न केलेल्या अभिनेत्यांपैकी एक सुनील आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now