दादांचा शिलेदार कोंडीत, सुनील शेळकेंच्या अडचणी आणखी वाढल्या

On: October 31, 2024 1:49 PM
Maval Vidhansabha
---Advertisement---

Pune | पुण्यातील मावळमध्ये महायुतीत ठिणगी पडलेली आहे. मावळचे विद्यमान आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजप नेते बाळा भेगडे नाराज आहेत.

दोन टर्म मावळचे आमदार राहिलेल्या बाळा भेगडेंनी अपक्ष उमेदवार बापू भेगडेंचा प्रचार करण्याची भूमिका जाहीर केलेली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बाळा भेगडे यांची समजूत घालण्याचा, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. पण त्यानंतरही भेगडेंनी महायुतीचं काम करणार नसल्याची स्पष्ट भूमिका घेतली.

दादांचा शिलेदार अडचणीत

दुसरीकडे अजित पवारांच्या गटातील आमदार सुनील शेळकेंना घेरण्यासाठी शरद पवारांनी वेगळाच डाव टाकला. मावळची जागा महाविकास आघाडीत शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली आहे. पण इथे उमेदवार न देता पवारांनी बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर केला आहे.

आता आणखी एका पक्षाने भेगडेंना पाठिंबा दिला आहे. आज मावळमध्ये सर्वपक्षीय पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून मनसेने बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा दिल्याचं स्पष्ट केलं आहे. यामुळे शेळकेंच्या अडचणी वाढल्यात.

सुनील शेळके यांनी बापूसाहेब भेगडे यांच्यासोबत असणारे गावगुंड असा चुकीचा शब्दप्रयोग केला आहे. त्याचं स्पष्टीकरण देण्यासाठी आलो, आम्ही प्रतिनिधी लोकप्रतिनिधी सर्वजण बापूसाहेब भेगडे यांच्यासोबत आहोत. आम्ही मनसेचे सर्वजण त्यांना जाहीरपणे पाठिंबा देत असल्याचं मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळस्कर यांनी म्हटलं आहे.

मावळमध्ये अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांची ताकत आता वाढली आहे. महाविकास आघाडीसह, भाजप, मनसे यांनी देखील त्यांना पाठिंबा दिल्याने मावळ विधानसभा निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! प्रकाश आंबेडकरांची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल

अजित पवारांना धक्का, सोलापुरात तब्बल ‘इतक्या’ नेत्यांनी हाती घेतली तुतारी

लक्ष्मीपूजनापूर्वीच सोनं महागलं; जाणून घ्या आजचे लेटेस्ट भाव

भाजपचे ‘हे’ 12 नेते शिंदेंच्या धनुष्यबाणावर तर 5 जण घड्याळच्या तिकिटावर रिंगणात!

ऐन दिवाळीत उडणार महागाईचा भडका?, 1 नोव्हेंबरपासून ‘या’ नियमांत बदल होणार

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now