मोठी बातमी! Sunil Kedar यांना दुसरा झटका

On: December 24, 2023 2:28 PM
Sunil Kedar
---Advertisement---

मुंबई | काँग्रेस आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना सलग दुसरा मोठा झटका बसला आहे. सुनील केदार यांची आमदारकी रद्द करण्यात आली आहे. नागपूर पोलिसांनी विधीमंडळाला सुनील केदार यांच्या शिक्षेची माहिती दिली असून कोर्टाचे आदेश पाठवले होते. त्यानंतर विधीमंडळाने केदार यांच्या आमदारकीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Sunil Kedar यांची आमदारकी रद्द

नागपूर (Nagpur) जिल्हा बँक घोटाळ्याप्रकरणी (Bank Scam) सुनील केदार (Sunil Kedar) यांना पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आता त्यांची आमदारकी देखील रद्द करण्यात आलीये.

काय आहे नेमकं प्रकरण?

नागपूर जिल्हा बँकेत 125 कोटींहून अधिक रकमेचा घोटाळा उघडकीस आला. सुनील केदार हे तेव्हा काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2001 -02 मध्ये त्यांनी बँकेच्या रकमेतून होमट्रेड लिमिटेड मुंबई, इंद्रा मनी मर्चंट लिमिटेड आणि अन्य काही कंपन्यांकडून सरकार प्रतिभूती खरेदी करण्यात आल्या होत्या.

सहकार विभागाच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन करत ही गुंतवणूक झाली होती. पुढे खासगी कंपनी दिवाळखोरीत निघाल्याने बँकेतील शेतकऱ्यांचे पैसे बुडाले. या प्रकरणी केदार आणि अन्य आरोपींवर गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी सुनील केदार यांना आता 5 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

सुनील केदार अचानक रूग्णालयात

सुनील केदार यांच्यावर सध्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं. मायग्रेनमुळे सुनिल केदार यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. मायग्रेनमुळे त्यांना तीव्र डोकेदुखी असल्याने ऑक्सिजन ठेवलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

…तर तुम्हाला महिन्याला 9,250 रुपये पेन्शन मिळेल; Post Office ची जबरदस्त योजना

Hardik Pandya समोर चाहत्यांनी खरोखर “मुंबईचा राजा, रोहित शर्मा” घोषणा दिल्या का?, नवीनच माहिती आली समोर

Brij Bhushan Singh | ब्रिजभूषण सिंह यांना झटका; सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

सावधान! गुंतवणूकदारांना Share Market तज्ज्ञांचा अत्यंत महत्त्वाचा सल्ला

Pune-Ahmednagar | पुणे-नगर रस्त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली मोठी घोषणा

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now