यंदाच्या वर्षी ‘हा’ संघ विजेतेपद पटकवणार; सुनील गावस्करांच भाकीत खरं ठरणार का?

On: May 3, 2025 4:37 PM
IPL 2025
---Advertisement---

IPL 2025 Champion Prediction | आयपीएल 2025 हंगाम अंतिम टप्प्याकडे झुकत असताना, कोणता संघ ट्रॉफी उचलणार याबाबत तर्क-वितर्क सुरू आहेत. भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil gavaskar) यांनी मात्र याचा स्पष्ट अंदाज वर्तवला आहे. त्यांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) या संघाला यंदाच्या हंगामातील विजेतेपदासाठी सर्वात मजबूत दावेदार ठरवलं आहे.

गावसकर यांच्या मते, आरसीबीने यंदाच्या हंगामात अपवादात्मक कामगिरी केली आहे. 10 सामन्यांमध्ये 7 विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये 14 गुणांसह तिसऱ्या स्थानावर असलेला हा संघ ट्रॉफी उचलण्याच्या शर्यतीत इतरांपेक्षा काही पावलं पुढे आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

आरसीबीकडून फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात कमालीची कामगिरी :

सुनील गावसकर म्हणाले, “RCB ने संपूर्ण हंगामात अत्यंत प्रभावी फलंदाजी केली आहे. यासोबतच त्यांच्या क्षेत्ररक्षणातील सातत्य देखील उल्लेखनीय आहे.” संघातील विराट कोहली, देवदत्त पडिकल, टीम डेविड, कृणाल पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि जोश हेजलवूड या खेळाडूंनी संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

विशेष म्हणजे, आरसीबीने (RCB) मागील काही हंगामांमध्ये चांगली सुरुवात करूनही अंतिम फेरी गाठण्यात अपयश अनुभवले आहे. मात्र यंदा त्यांच्या कामगिरीत झळाळी आहे आणि संघ अधिक सुसंगत आणि आत्मविश्वासपूर्ण वाटतो आहे.

IPL 2025 Champion Prediction | मुंबई इंडियन्सही शर्यतीत, पण RCB दोन पावलं पुढे – गावसकर :

गावसकर यांनी यावेळी मुंबई इंडियन्स (MI) संघाचाही विशेष उल्लेख केला. मुंबईने सलग 6 सामने जिंकत पुनरागमन केलं आहे, मात्र तरीही RCB थोडीशी आघाडीवर असल्याचं गावसकरांनी स्पष्ट केलं. “मुंबई चांगला खेळ करत आहे, पण RCB त्यांच्यापेक्षा दोन पावलं पुढे आहे,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.

आता आयपीएल 2025 चा अंतिम टप्पा जवळ आल्याने क्रिकेटप्रेमींचं लक्ष RCB ही लय कायम ठेवते का याकडे लागलं आहे. त्यांच्या दृष्टीने आगामी सामने निर्णायक ठरणार आहेत.

News Title: Sunil Gavaskar Predicts RCB Will Win IPL 2025 – Says They’re Ahead of MI

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now