Maharashtra l आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतले जात आहेत. अशातच आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता गड किल्ल्यांवर जाऊन दारू आणि ड्रग्जचे सेवन केल्यास मोठी शिक्षा होणार आहे.
मंत्रिमंडळ बैठकीत घेतला मोठा निर्णय :
राज्यातील गड किल्ल्यांचे संवर्धन आणि सुभोशीकरण हा कायमच सामाजिक व राजकीय चर्चेचा विषय असतो. मात्र महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांबद्दल प्रत्येक नागरिकाच्या मनात आदराचं स्थान आहे. मात्र यापूर्वी राज्यातील काही किल्ल्यांवर मद्यपान आणि ड्रग्ज घेतल्याच्या घटना आढळून आल्या होत्या.
याशिवाय आजकालची व्यसनाधी तरुणाई देखील गड किल्ल्यांवरील मोकळ्या जागेत असे धक्कादायक कृत्य करताना आढळत असतात. मात्र आता शासनाने या कृत्याला कायदेशीर लगाम लावण्याचा निर्णय घेतला आहे. कां आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. गड किल्ल्यांवर दारू, ड्रग्जचे सेवन केल्यास त्यांना तब्बल 2 वर्षांची शिक्षा आणि 1 लाख रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.
Maharashtra l राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ :
यासोबतच आज मंत्रिमंडळ बैठकीत अजून काही मोठे निर्णय घेतले आहेत. मुंबई येथील वडाळा सॉल्ट पॅनमधील भूखंड शैक्षणिक कारणांसाठी देण्याचा आणि रमाई आवास, शबरी आवास योजनेतील घरकूल अनुदानात देखील वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.
तसेच गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या देखील योजना कायमस्वरूपी राबवणार असून त्यासाठी तब्बल 2,604 कोटीस मान्यता दिली आहे. यासह राज्यातील अकृषिक कर देखील पूर्णपणे माफ करण्यात आला आहे.
News Title – Sudhir mungantiwar on cabinet decision of fort
महत्त्वाच्या बातम्या-
लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबर, नोव्हेंबरचे पैसे ‘या’ दिवशी जमा होणार
‘या’ राज्याने घेतला मोठा निर्णय! आता फक्त 99 रुपयांमध्ये मिळणार दारु
बाईक घ्यायचा विचार करताय? तर इंडियामध्ये ‘या’ आहेत टॉप-5 बाईक
मोठी बातमी! हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार, भाजपला ठोकला रामराम
आता भारतीय रेल्वेचंही होणार खासगीकरण?, रेल्वेमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं






