Sudarshan Ghule | बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले यांनी पोलिसांसमोर दिलेल्या जबाबांमध्ये थरकाप उडवणारे तपशील समोर आले आहेत. या कबुलीजबाबांनुसार, देशमुख यांना दोन तासांहून अधिक काळ अमानुषपणे मारहाण करण्यात आली.
अमानुष मारहाणीचे तपशील-
सुदर्शन घुलेच्या (Sudarshan Ghule) कबुलीनुसार, सरपंच संतोष देशमुख यांना लाकडी काठी, प्लास्टिक पाईप, क्लच वायर आणि गॅस पाईप यांसारख्या वस्तूंनी दोन तासांपेक्षा जास्त वेळ मारहाण करण्यात आली. मारहाणीदरम्यान, घुलेने जयराम चाटेच्या मोबाईलवरून विष्णू चाटेशी दोन ते तीन वेळा संवाद साधला. विष्णू चाटेने घुलेला निर्देश दिले की, “त्याला असं मारा की आपली दहशत कायम राहिली पाहिजे.”
प्रतीक घुलेच्या क्रूर कृत्ये-
मारहाणीच्या वेळी, प्रतीक घुलेने सरपंच देशमुख यांच्या तोंडात लघवी केली. त्यानंतर, पाठीवर झोपलेल्या देशमुख यांच्या छातीवर पळत येऊन दोन्ही पायांनी उडी मारली. या अत्याचारांमुळे देशमुख यांनी रक्ताची उलटी केली आणि ते निपचित पडले.
हत्या आणि मृतदेहाची विल्हेवाट-
देशमुख निपचित पडल्यावर, आरोपींनी (Sudarshan Ghule) त्यांना स्कॉर्पिओ गाडीत टाकले. दिवस असल्याने, त्यांनी अंधार पडण्याची वाट पाहिली. अंधार झाल्यावर, देशमुख यांचा मृतदेह दैठणा फाट्याजवळ रस्त्याच्या कडेला फेकण्यात आला. त्यानंतर, आरोपी वाशी गावाकडे स्कॉर्पिओ गाडीतून निघून गेले.
पोलिस तपासात संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचे १५ व्हिडिओ आणि ८ फोटो हस्तगत करण्यात आले आहेत. या माध्यमांतून दिसते की, देशमुख यांना तब्बल दोन तासांपर्यंत अमानुष मारहाण करण्यात आली. पहिला व्हिडिओ दुपारी ३:४६ वाजता तर शेवटचा ५:५३ वाजता चित्रीत करण्यात आला आहे. या काळात देशमुख यांना सातत्याने अत्याचार सहन करावे लागले.
हत्या प्रकरणातील धक्कादायक पुरावे-
आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबांनुसार, सुग्रीव कराडच्या आदेशानुसार सुदर्शन घुलेला मारहाण करण्यात आली होती. तसेच, संतोष (Santosh Deshmukh) देशमुख यांनी घुलेला मारहाण केली होती. फरार आरोपी कृष्णा आंधळेने देखील सुग्रीव कराडचे नाव घेतले आहे. सुग्रीव कराड हा केज येथील रहिवासी असून, त्याच्यावर गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.






