Maharashtra Weather Alert | महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसांपासून तापमानाचा कडाका जाणवत असतानाच आता हवामानात मोठा पलटाव होत असल्याचे दिसत आहे. उष्णतेच्या लाटेनंतर राज्यात अचानक ढगाळ वातावरण तयार झाले असून विजांच्या कडकडाटासह पाऊस, वादळी वारे आणि काही भागांत गारपीट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नागरिकांनी पुढील दोन दिवस विशेष सतर्क राहण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
राज्यात 24 ते 48 तास हवामान अस्थिर :
मंगळवार, 18 मार्च 2026 रोजी राज्यातील अनेक भागांत हवामानात अचानक बदल जाणवू लागला. पुढील 24 ते 48 तास राज्यासाठी संवेदनशील ठरू शकतात, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) व्यक्त केला आहे. विशेषतः विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र तसेच मुंबई आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, विजांचा कडकडाट आणि हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. काही भागांत ताशी 30 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज असून त्यामुळे नागरिकांना खबरदारी घ्यावी लागणार आहे. या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील 21 हून अधिक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. (Maharashtra Weather Alert)
मराठवाड्यात (Marathwada) काही ठिकाणी तुरळक पावसासोबत विजांचा कडकडाट होऊ शकतो. छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) आणि जालना (Jalna) जिल्ह्यांसह इतर भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. तापमानात थोडीशी घट झाली असली तरी उन्हाचा त्रास काही प्रमाणात कायम राहणार आहे. या विभागातील सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आला असून नागरिकांनी वीजांचा कडकडाट होत असताना सुरक्षित ठिकाणी राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Maharashtra Weather Alert | पुण्यासह अनेक जिल्ह्यांत वादळी वारे :
मध्य महाराष्ट्रात (Central Maharashtra) हवामान अधिक अस्थिर राहण्याचा अंदाज आहे. पुणे (Pune), सोलापूर (Solapur), सांगली (Sangli), सातारा (Satara), कोल्हापूर (Kolhapur) आणि अहिल्यानगर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या भागांत ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात आणि पुढील 24 तासांत या वाऱ्यांचा वेग वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक बाहेर जाणे टाळावे आणि सुरक्षिततेची काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.
उत्तर महाराष्ट्रातील (North Maharashtra) नाशिक (Nashik), धुळे (Dhule), नंदूरबार (Nandurbar) आणि जळगाव (Jalgaon) या जिल्ह्यांत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. येथे हलका पाऊस पडू शकतो आणि 19 मार्चसाठी यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे. दरम्यान मुंबई (Mumbai) आणि कोकण (Konkan) विभागातही हवामानात बदल होण्याची चिन्हे दिसत आहेत. रायगड (Raigad) आणि रत्नागिरी (Ratnagiri) या जिल्ह्यांसाठी 48 तासांचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मुंबईत कमाल तापमान सुमारे 31 ते 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता असून पुढील दोन दिवस हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो.






