“भिकाऱ्यांची संख्या वाढली, साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा”

On: January 5, 2025 6:04 PM
Sujay Vikhe
---Advertisement---

Sujay Vikhe | सामान्य‌ दिवशी साई प्रसादालयात दिवसभरात 50 ते 60 हजार भक्त मोफत भोजनाचा लाभ घेतात. शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी 70 ते 80 हजार भक्त जेवतात. हे मोफत जेवण बंद करण्याची मागणी भाजप नेते सुजय विखेंनी (Sujay Vikhe) केलीये.

साई प्रसादालयात मोफत जेवण बंद करा- सुजय विखे

फुकट जेवणामुळे महाराष्ट्रातील भिकारी येथे गोळा झाले आहेत. हे पैसे मुलांच्या भवितव्यासाठी, शिक्षणासाठी खर्च करावे, अशी मागणी माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe) यांनी केलीय. सुजय यांच्या या वक्तव्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.

Sujay Vikhe | साईभक्त आक्रमक

सुजय विखे यांच्या वक्तव्यानंतर साई प्रसादालयात जेवणासाठी आलेल्या देशभरातील साईभक्तांनी नाराजी व्यक्त केलीय. साईबाबांनी आपल्या हयातीत आरोग्य सेवा आणि भुकेलेल्यांना मोफत जेवन दिले. गरज असेल अशा ठिकाणी शुल्क आकारणे ठीक आहे. पण सर्वसामान्यांना जर मोफत जेवण मिळतंय त्यात आक्षेप घेण्याच कारण काय? असा सवाल साईभक्तांनी उपस्थित केलाय.

तर काही साई भक्तांनी सुजय विखे यांनी केलेल्या मागणीला पाठिंबा देत जो साईभक्त देश-विदेशातून साईबाबांच्या दर्शनाला येतो तो साईभक्त दहा ते पंधरा रुपयांचं शुल्क जेवणासाठी देऊ शकतो, असं काही साईभक्त म्हणत आहेत.

देणगीदार साई भक्तांनी 365 दिवस अन्नदानासाठी बुकिंग करून ठेवलं असून याचा आर्थिक बोजा साईबाबा संस्थानवर पडत नाही. साई संस्थानकडे साडेचारशे कोटीहून अधिक निधी अन्नदानासाठी पडून आहे. तो निधी साई संस्थांनला अन्य कुठेही वापरता येत नाही. अनावश्यक लोकांनी येथे येऊन जेवण करणे आणि गुन्हेगारी वाढणे या दृष्टीने बघू नये. महाप्रसाद म्हणून भाविक साई प्रसादालयात भोजन करत असतात, असं साई संस्थानचे माजी विश्वस्त आणि काँग्रेसचे पदाधिकारी एकनाथ गोंदकर यांनी म्हटलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

धस सुसाट, मौनी दादांनाही मधे ओढलं, फडणवीसही दम देईनात, कारण काय?

घटस्फोट झाल्यास चहलच्या बायकोला ‘इतक्या’ कोटींची पोटगी मिळणार?

हिवाळ्यात डोकं नेमकं का दुखतं?, ‘या’ डोकेदुखीवर वापरा हे रामबाण उपाय

प्रयागराज कुंभमेळ्यात ‘या’ बाबांनी वेधलं सर्वांचं लक्ष, तब्बल 32 वर्ष केली नाही अंघोळ!

“देवेंद्रजी, धस यांना जाब विचारणार की बेभान सुटलेला बैल आणखी मोकाट सोडणार?”

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now