दिवाळीनिमित्त एसटी महामंडळाने केली सर्वात मोठी घोषणा!

On: October 22, 2024 11:39 AM
MSRTC
---Advertisement---

ST Bus News l नागरिक दिवाळी सुट्ट्यांमध्ये एसटी बसने प्रवास करण्याला जास्त प्राधान्य देतात. कारण आपला प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी प्रत्येक्जण एसटी बसने प्रवास करण्यावर भर देत असतात. अशातच आता ऐन दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर एसटी मंडळाने एक महत्वाचं निर्णय घेतला आहे. आता राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात 2400 बस दाखल होणार आहेत. त्यामधील साध्या डिझेल बसपैकी पहिली बस ही रविवारी दापोडीमध्ये दाखल झाली आहे.

दिवाळीमध्ये प्रवाशांची गैरसोय होणार नाही :

याशिवाय दिवाळीपर्यंत आणखी 50 बस प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल होणार आहेत. त्यामुळे आता ऐन दिवाळीमध्ये लालपरीच्या फेऱ्या देखील वाढवण्यात येणार आहेत. यावेळी पालघर विभागातील आठ आगारातून 25 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबरपर्यंत लांब पल्ल्याच्या एकूण 38 फेऱ्या सुरू करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. तसेच नागरिकांनी देखील या सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन पालघर विभागाकडून करण्यात आले आहे.

याशिवाय महाराष्ट्र राज्य मार्ग व परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिलांना तिकीट दरांमध्ये ५० टक्के सवलत देण्यात आली आहे. तसेच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसाठी देखील बसमध्ये मोफत प्रवास करण्याची सवलत या अतिरिक्त बसमध्ये देण्यात येणार आहे.

ST Bus News l पुण्यातून 250 धावणार अतिरिक्त बस धावणार :

याशिवाय पुण्यामध्ये अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी व नोकरीचीसाठी बाहेर गावाहून येत असतात. त्यामुळे अशा नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून दिवाळीनिमित्त पुण्यातून 250 धावणार अतिरिक्त एसटी बसेस धावणार आहेत.

यामध्ये लातूर, नाशिक बीड आणि अकोला या ठिकाणांहून जादा बसेस देखील मागवल्या आहेत. त्यामुळे आता दिवाळीनिमित्त पुण्यातून गावी जाणाऱ्याची संख्या सर्वात जास्त असल्याने या अतिरिक्त बसेस मागवण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता प्रवाशांची देखील गैरसोय होणार नाही.

News Title : Maharashtra ST Bus News

महत्वाच्या बातम्या –

ठाकरेंचे 53 शिलेदार ठरले?, पाहा कुणाला मिळालं तिकीट तर कुणाचा पत्ता कट?

पुणेकरांसाठी सर्वात महत्वाची बातमी! आता यापुढे रोज रात्री 11 ते पहाटे 3 वाजेपर्यंत…

दहावीच्या परीक्षेत मोठा बदल, आता ‘या’ विषयात 20 गुण मिळाले तरी विद्यार्थी होणार पास

ये रिश्ता क्या केहलाता है?, रात्री 12च्या ठोक्याला दिलेल्या शुभेच्छांची खमंग चर्चा!

पुण्यात सापडलेलं 5 कोटी घबाड कुणाचं?; संजय राऊत म्हणाले,’काय झाडी..काय डोंगर’

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now