विद्यार्थ्यांनो… दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये पुन्हा बदल?

On: November 22, 2024 1:08 PM
SSC Board Exams 2025
---Advertisement---

SSC Board Exams 2025 l महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्चमध्ये बोर्डाच्या परीक्षा घेण्यात येणार आहेत. मात्र दहावीच्या पासिंग मार्कांमध्ये बदल केल्याने आता पालक व विद्यार्थी संभ्रमात आहेत. परंतु यासंदर्भात बोर्डानं खुलासा केला आहे.

दहावीच्या परीक्षेमध्ये किती मार्क्सला पास असणार? :

बोर्डाने दिलेल्या माहितीनुसार, इयत्ता दहावीसाठी उत्तीर्णतेचे निकष अर्थात काठावर पास होण्यासाठीच्या गुणांची मर्यादा मागील काही वर्षांपासून चालत आलेल्या प्रचलित नियमांप्रमाणेच असेल असं शिक्षण मंडळानं स्पष्ट केलं आहे.

तर दहावीच्या परीक्षेमध्ये गणित आणि विज्ञान या विषयांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 20 गुणांपेक्षा जास्त आणि 35 गुणांहून कमी गुण असले तरीही विद्यार्थी उत्तीर्ण होऊन महाविद्यालयीन प्रवेशासाठी पात्र असतील असं या प्रस्तावात दिल होत.

SSC Board Exams 2025 l दहावीच्या परीक्षा कधी आहेत ? :

मात्र आता सदरील बदल अद्यापही प्रस्तावित असून यामध्ये यावर्षी  कोणतेही बदल झाले नाहीत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सर्व विषयांमध्ये पास होण्यासाठी 35 गुण मिळवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक देखील जाहीर केलं आहे. त्यानुसार आता 11 फेब्रुवारी 2025 ते 18 मार्च 2025 या कालावधीत बारावीची परीक्षा पार पडणार आहे. तर दहावीच्या परीक्षा ही 21 फेब्रुवारी 2025 ते 17 मार्च 2025 दरम्यान पार पडणार असल्याचं बोर्डाने जाहीर केलं आहे.

News Title – SSC Board Exams 2025

महत्त्वाच्या बातम्या-

सत्ता स्थापनेबाबत प्रकाश आंबेडकरांचं मोठं वक्तव्य; थेट म्हणाले..

भाजपकडून अपक्षांना ‘इतक्या’ कोटींची ऑफर?; राजकारणात खळबळ

विधानसभा निवडणुकीत विजयाची शक्यता असलेल्या अपक्ष उमेदवारांची यादी आली समोर!

कॉँग्रेसच्या तब्बल ‘इतक्या’ जागा येणार?, नाना पटोलेंनी CM पदाबाबतही केला मोठा दावा

‘बटेंगे तो कटेंगे’वर होणार कारवाई?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now