Bollywood News | श्रीदेवींच्या सौंदर्याने आणि अभिनयाने सगळ्यांनाच वेड लावलं आहे. पण एका दिग्दर्शकाने मात्र, श्रीदेवीची देवीसारखी पूजा केली. अभिनेत्री श्रीदेवी (Sridevi) या केवळ अभिनयासाठीच नव्हे, तर त्यांच्या सौंदर्यासाठीही प्रसिद्ध होत्या. अनेक दिग्दर्शक, अभिनेते त्यांच्या प्रेमात होते, पण एक दिग्दर्शक श्रीदेवींचे प्रचंड मोठे चाहते होते. ते श्रीदेवींच्या प्रेमात एवढे वेडे झाले होते की त्यांनी आपल्या खोलीत तिचे पोस्टर्स, मासिकातील फोटो आणि कात्रणे लावून ती खोलीच श्रीदेवींना समर्पित केली होती.
श्रीदेवींवर भक्तीभावाने प्रेम :
बॉलिवूडपासून दक्षिणेपर्यंत श्रीदेवींनी राज्य केलं. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने त्यांनी लाखो चाहत्यांच्या हृदयात स्थान मिळवलं. त्या चाहत्यांमध्ये सगळ्यात पहिल्या क्रमांकावर होते ते म्हणजे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि सिनेमॅटोग्राफर रवी के. चंद्रन. रवी के. चंद्रन (ravi k chandran) हे त्या चाहत्यांमध्ये सर्वाधिक भक्तिभावाने प्रेम करणारे होते. त्यांनी श्रीदेवींना देवीप्रमाणे पूजलं. हॉस्टेलमध्ये असताना ते तिच्याशी संबंधित मासिके आणि पोस्टर्स चोरून आणायचे आणि आपल्या खोलीत लावायचे. त्यांच्या रुममध्ये इतके फोटो होते की, ती खोली एक ‘श्रीदेवी मंदिर’च वाटायची. इतकंच नव्हे, तर परीक्षेपूर्वी विद्यार्थी त्या रुममध्ये येऊन श्रीदेवींना ‘आशीर्वाद’ मागायचे.
श्रीदेवींच्या (Sridevi) अभिनयाबद्दल आणि सौंदर्याबद्दल रवी के. चंद्रन नेहमीच बोलत असत. त्यांना तिच्या डोळ्यांमधील अभिव्यक्ती आणि स्क्रीनवरचा ग्रेस इतका आवडायचा की ते म्हणायचे, “श्रीदेवी ही फक्त अभिनेत्री नाही, ती भावना आहे.” तिच्या प्रत्येक भूमिकेचा त्यांनी अभ्यास केला होता. ती स्क्रीनवर दिसली की त्यांना इतर काहीच दिसत नव्हतं.
Bollywood News | अनिल कपूर यांनी पूर्ण केली दिग्दर्शकाची इच्छा :
रवी के. चंद्रन यांना त्यांच्या आयुष्यात एकदा श्रीदेवीला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली आणि ती संधी अनिल कपूर (Anil Kapoor) यांनी दिली. एका मुलाखतीत रवी म्हणाले, “मी राजकुमार संतोषींकडे कथा ऐकायला गेलो होतो. नंतर अनिल कपूरला फोन केला. त्याला माझ्या श्रीदेवीवेडाबद्दल कळलं आणि त्याने लगेचच माझी तिच्याशी भेट घडवून आणली.” थोड्याच वेळात श्रीदेवी स्वतः गाडीत येऊन बसली आणि त्या क्षणी रवी स्तब्ध झाले.
तिला पाहून त्यांचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्यांचं स्वप्न पूर्ण झालं होतं. मात्र दुर्दैवाने, त्यांना आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर काम करण्याची संधी कधीच मिळाली नाही. त्यांनी ‘ब्लॅक’, ‘फना’, ‘दिल चाहता है’, ‘पहेली’ आणि ‘विरासत’ सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं, पण श्रीदेवींसोबत कधीच नाही. (ravi k chandran Statement)
श्रीदेवींच्या निधनाने रवी के. चंद्रन यांना प्रचंड धक्का बसला. त्या २४ फेब्रुवारी २०१८ रोजी दुबईमध्ये निधन पावल्या. आजही रवी त्यांना देवीसारखं मानतात आणि म्हणतात, “श्रीदेवी फक्त पडद्यावर नव्हती, ती माझ्या आयुष्याचा एक पवित्र भाग होती.” त्यांच्या या भक्तीभावपूर्ण प्रेमकथेने संपूर्ण बॉलिवूडला भावूक केलं.






