Kumbh Mela 2025 | प्रयागराज (Prayagraj) येथे होणाऱ्या महाकुंभमेळ्यासाठी (Kumbh Mela 2025 ) जाणाऱ्या भाविकांसाठी हुबळी ते वाराणसी (Varanasi) दरम्यान विशेष रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. ही गाडी पुणे (Pune), सातारा (Satara), दौंड (Daund), मिरज (Miraj), सांगली (Sangli) आणि अहमदनगर (Ahmednagar) मार्गे धावणार आहे.
विशेष रेल्वेचे वेळापत्रक
प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन हुबळी-वाराणसी विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहे.
ट्रेन क्रमांक ०७३८३: ही विशेष रेल्वे गाडी दि. १४, २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी हुबळी येथून सकाळी आठ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी सकाळी साडेपाच वाजता वाराणसी येथे पोहोचेल.
ट्रेन क्रमांक ०७३८४: ही विशेष गाडी दि. १७ आणि २४ फेब्रुवारी, तर ३ मार्च रोजी वाराणसी येथून सकाळी पाच वाजता सुटेल आणि हुबळी येथे तिसऱ्या दिवशी रात्री १२ वाजून ४५ मिनिटांनी पोहोचेल. या गाडीला एक वातानुकूलित द्वितीय, ४ वातानुकूलित तृतीय, ११ शयनयान, १ सामान्य द्वितीय सिटिंग गार्ड्स ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर कार असेल. ही ट्रेन मिरज, सांगली, किर्लोस्करवाडी, कराड (Karad), सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, कोपरगाव (Kopargaon), मनमाड (Manmad), भुसावळमार्गे धावणार आहे.
मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या
मध्य रेल्वे (Central Railway) महाकुंभमेळ्यासाठी ४२ विशेष गाड्या चालवत आहे. त्यापैकी १८ फेऱ्या मुंबई (Mumbai) ते बनारस/मऊदरम्यान, १२ नागपूर (Nagpur) ते दानापूरदरम्यान आणि १२ पुणे ते मऊदरम्यान धावतील. (Kumbh Mela 2025)
दानापूरच्या विशेष फेऱ्या
- बीदर (Bidar) ते दानापूर (Danapur) विशेष: दोन फेऱ्या
- चर्लपल्ली ते दानापूर विशेष: चार फेऱ्या
- मछलीपट्टणम ते दानापूर विशेष: चार फेऱ्या (Kumbh Mela 2025)
Title : Special Train for Punekars to Kumbh Mela 2025






