Soyabean Cotton Subsidy l राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्या शेतकऱ्यांनी 2023 च्या खरीप हंगामात सोयाबीन आणि कापसाचे उत्पादन घेतले होते त्यांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र त्या निर्णयाप्रमाणं राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर 2398 कोटी 93 लाख रुपये वर्ग देखील केले आहेत. मात्र आता या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत आवश्यक आहे.
ई केवायसी करणे बंधनकारक :
शेतकऱ्यांना 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्य मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे. यावेळी पहिल्या टप्प्यात तब्बल 49 लाख 50 हजार खातेदारांच्या खात्यांमध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत.
मात्र आता या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई केवायसी प्रक्रिया पूर्ण बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कृषी विभागाने शेतकऱ्यांना देण्यात येणारं अनुदान हे कोणत्याही मध्यस्थांच्या हस्तक्षेपाशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचावं यासाठी ई केवायसी करणे गरजेचे आहे.
Soyabean Cotton Subsidy l ई केवायसी प्रक्रिया नेमकी कशी करायची? :
ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही ई केवायसी प्रक्रिया केली नाही अशा शेतकऱ्यांनी https://uatscagridbt.mahaitgov.in/ या वेबसाईटला जाऊन ई केवायसी करणे गरजेचे आहे. याशिवाय 2023 च्या खरीप हंगामात तब्बल 96 लाख 787 खातेदार शेतकरी हे सोयाबीन व कापूस उत्पादक होते. त्यानुसार त्यांना मदत करण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागाने एकूण मिळून 4194 कोटी रुपये इतका निधी डीबीटी प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला आहे.
तसेच त्यापैकी 1548 कोटी 34 लक्ष रुपये कापूस तर सोयाबीन साठी 2646 कोटी 34 लक्ष रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे. याशिवाय शेतकऱ्यांना या योजनेतून प्रति हेक्टरी तब्बल 5 हजार रुपये आणि 2 हेक्टर मर्यादेत 10 हजार रुपये अनुदान मंजूर देखील करण्यात आले आहे.
News Title – Soyabean Cotton Subsidy News
महत्वाच्या बातम्या-
पुणे जिल्ह्यात रात्रीचे फिरतात संशयित ड्रोन? नागरिकांमध्ये पसरली दहशद
मोठी बातमी! अभिनेता गोविंदाला लागली गोळी, रुग्णालयात उपचार सुरू
“उद्धव ठाकरेंनी निवडणूक लढवून आमदार होऊन दाखवावं”
“गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र पाजा”; भाजप नेत्याचा अजब सल्ला
मोठी बातमी! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?






