सोनम आणि तिचे 1×3 कनेक्शन! ‘त्या’ 3 रहस्यांनी 3 राज्यांच्या पोलिसांची झोप उडवली

On: June 21, 2025 3:20 PM
Raja Raghuvanshi Murder Case
---Advertisement---

Sonam Raghuvanshi | राजा रघुवंशीच्या खून प्रकरणात आरोपी असलेल्या सोनम रघुवंशीच्या तपासात दररोज नवे वळण समोर येत आहेत. शिलॉंग पोलिसांनी ‘1×3 थिअरी’ मांडल्याने या प्रकरणाने आता तीन राज्यांची पोलिस यंत्रणा हादरली आहे. सोनमने तिन्ही राज्यांत फिरून एका मोठ्या कटाची आखणी केली होती, हे आता उघड होत आहे. (Sonam Raghuvanshi)

शिलॉंगमध्ये ‘ऑपरेशन हनीमून’ अंतर्गत क्राइम सीन रिक्रिएट करण्यात आला आणि तपासात धक्कादायक खुलासे झाले. सोनम एकाच वेळी तीन पुरुषांशी संबंध ठेवत होती. नवरा राजा रघुवंशी, पहिला प्रियकर राज कुशवाह आणि दुसरा प्रियकर संजय वर्मा. पोलिसांनी सांगितले की, हत्येच्याच दिवशी म्हणजे 23 मे रोजी सोनम, राजा आणि अन्य आरोपी एकत्र दिसल्याचा व्हिडीओ मिळाला आहे.

सोनमची 1×3 थिअरी, सुपारी किलर, आणि राज्यांमधील पलायन :

पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले की, सोनमने राजाचा खून हा सेल्फी अपघाताचा बनाव दाखवून लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र हवामानामुळे तिची योजना फसली आणि शेवटी तिने सुपारी किलरच्या मदतीने हत्या केली. पोलिसांनी एक चाकू जप्त केला असून दुसऱ्याचा शोध सुरू आहे. (Raja Raghuvanshi Death Case)

हत्या शिलॉंगमध्ये, प्लानिंग इंदौरमध्ये आणि पळवाट गाझीपूरमार्गे घेतल्याने या प्रकरणाने तीन राज्यांच्या पोलिसांचं लक्ष वेधलं आहे. सोनमने हत्येनंतर बुरखा घालून सिलिगुडी, पटना, इंदौर मार्गे गाझीपूर गाठलं. यामध्ये तिचा भाऊ गोविंद आणि दुसरे प्रियकर संजय वर्माही संशयाच्या भोवऱ्यात आहेत. पोलिसांनी त्यांच्या संवादांची चौकशी करत संजयशी 200 हून अधिक चॅट्स समोर आणले आहेत.

Sonam Raghuvanshi | व्हिडीओ, पुरावे, आणि अजून अनुत्तरित प्रश्न :

पोलिसांच्या हाती लागलेला यूट्यूबर देवेंद्र सिंहचा व्हिडीओ हा या प्रकरणात ‘टर्निंग पॉईंट’ ठरत आहे. सोनमने राजाचा फोनही फोडून मृतदेह दरीत फेकण्याचा प्रयत्न केला होता. मात्र ती योजना अर्धवट राहिली. (Raja Raghuvanshi Death Case)

दरम्यान, राजच्या कुटुंबीयांनी सोनमवर आणि तिच्या भावावर गंभीर आरोप केले आहेत. संजय वर्मा हत्येत सहभागी होता का, यावर अजूनही निश्चितता नाही. पण सोनमच्या तीन प्रेमसंबंधांमुळे ही केस अधिक गुंतागुंतीची झाली आहे. पोलिसांना अजूनही हत्येच्या प्रेरणेचा नेमका धागा सापडलेला नाही.

News Title: Sonam Raghuvanshi Murder Case: 1×3 Theory Shocks Police in 3 States

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now