‘इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर ‘त्या’ गोष्टींचा दबाव’; सोनाक्षी सिन्हाचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

On: December 19, 2024 8:12 PM
sonakshi sinha
---Advertisement---

Sonakshi Sinha | दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा कायम आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर आपल्या नवऱ्यासोबत ती रोज नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. सोनाक्षी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम सक्रिय असते. दरम्यान, सध्या चर्चा आहे ती, तिने केलेल्या खुलाशाची. सोशल मीडियावर सोनाक्षीची एक मुलाखत व्हायरल होत आहे.

काय म्हणाली सोनाक्षी?

एका मुलाखतीमध्ये बोलत असताना सोनाक्षीने (Sonakshi Sinha) इंडस्ट्रीतील काही गोष्टींचा गौप्यस्फोट केला आहे. मी वयाने मोठी दिसत असल्यामुळे मला एका अभिनेत्याने सोबत काम करण्यासाठी नकार दिला होता. एवढंच नाही तर, पुढे सोनाक्षी म्हणाली की, जर असा विचार केला जात असेल, तर मला देखील अशा अभिनेत्यासोबत स्क्रिन शेअर करायला अवडणार नाही.

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona)

अभिनेत्रींवर दबाव-

बोलत असताना सोनाक्षी (Sonakshi Sinha) म्हणाली की, इंडस्ट्रीमध्ये अभिनेत्रींवर दबाव असतो, एक गोष्ट स्पष्ट आहे आणि ती म्हणजे ज्या अपेक्षा अभिनेत्रींकडून असतात, त्या अभिनेत्यांकडून नसतात.

अभिनेत्यांना वयाचं बंधन नसतं. जेव्हा ते स्वतःपेक्षा 30 वर्ष लहान अभिनेत्रींसोबत रोमान्स करतात. केस कमी आणि बेली फॅट असेल तरी अभिनेत्यावर टीका केली जात नाही. महिलांना कायम दोष दिला जातो. अनेक अभिनेत्यांना मी सामोरी गेली आहे, ज्यांना मी त्यांच्यापेक्षा वयाने मोठी वाटते, अशा अभिनेत्यांचे मी आभार मानते, असं देखील सोनाक्षी म्हणाली.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा जहीर इक्बालसोबत काही महिन्यांपूर्वी लग्न बंधनात अडकली. गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट केल्यानंतर या कपलने एकदम खासगी पद्धतीने लग्न केलं. सोनाक्षी आणि जहीर सोशल मीडियावर कोणत्या न कोणत्या कारणावरुन ट्रोल होत असताना दिसतात. आपल्या चाहत्यांसाठी ती सतत दोघांचे कपल गोल्सचे फोटो व्हिडीओ शेअर करत असते.

News Title : Sonakshi Sinha reveals about industry

महत्त्वाच्या बातम्या-

सासऱ्याने जावयावर केला अ‍ॅसिड हल्ला! कारण ठरलं हनीमूनचं…

… तर मग नव्या मंत्र्यांनी काय करायचं?; शिंदे गटाच्या आमदाराचा संतप्त सवाल

अमित शाहांच्या वक्तव्याने वाद, आंबेडकरांचा फोटो हाती घेत मविआचं आंदोलन

“वाल्मिक कराडला अटक झाली नाही तर बीडमध्ये…”; आमदार क्षीरसागर कडाडले

मुंबईला केंद्रशासित प्रदेश करा; काँग्रेसच्या ‘या’ नेत्याची मागणी

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now