सोनाक्षी सिन्हाने सासूबद्दल केला मोठा खुलासा, म्हणाली…

On: November 5, 2025 3:09 PM
Sonakshi Sinha
---Advertisement---

Sonakshi Sinha | बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा मागील काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. शत्रुघ्न सिन्हा यांची कन्या असलेल्या सोनाक्षीने अभिनेता जहीर इक्बाल याच्यासोबत लग्न केल्यापासून तिच्या लग्नातील आणि कुटुंबातील घडामोडी चर्चेत आहेत. लग्नाच्या वेळी तिचे दोन्ही भाऊ उपस्थित नव्हते, त्यामुळे सिन्हा कुटुंबातील मतभेदांचे संकेत मिळाले होते. (Sonakshi Sinha)

सोनाक्षी आणि जहीरचे लग्न अत्यंत साधेपणाने पार पडले, परंतु लग्नानंतर आयोजित खास पार्टीत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. यानंतर सोनाक्षी लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी रूग्णालयात गेल्याचे पाहिले गेले आणि तिच्या प्रेग्नंसीबाबतही अफवा सुरू झाल्या.

‘सासूबद्दल’ सोनाक्षीचा पहिला खुलासा :

सोनाक्षी सिन्हा अलीकडेच कॉमेडियन भारती सिंह (Bharati singh) आणि तिचे पती हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्ट शोमध्ये दिसली. या मुलाखतीदरम्यान तिने पहिल्यांदाच लग्नानंतरच्या तिच्या आयुष्याबद्दल आणि सासरच्या मंडळींबाबत अनेक गोष्टी सांगितल्या.

ती म्हणाली, “मला अजिबातच स्वयंपाक येत नाही. माझ्या आईला नेहमी माझी हीच चिंता असायची. पण आता मला कळलं की मी योग्य घरात आलेय, कारण माझ्या सासूला सुद्धा स्वयंपाक येत नाही!” असे सांगत सोनाक्षीने हसत-हसत आपल्या सासूबद्दलचा हा गमतीदार खुलासा केला.

Sonakshi Sinha | ‘जहीरसोबतचं आयुष्य आनंदात’ :

सोनाक्षी (Sonakshi Sinha) पुढे म्हणाली की, ती लग्नानंतर जहीर इक्बाल आणि त्याच्या कुटुंबियांसोबत राहते आणि त्यांच्याशी तिचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. “आम्ही सगळे मिळून वेळ घालवतो, आणि माझी सासू माझ्यावर मुलीसारखं प्रेम करते,” असं सोनाक्षीने सांगितलं.

ती सध्या तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. तरीही ती वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याचा समतोल साधताना दिसते. तिच्या या खुलाशानंतर चाहत्यांनी सोशल मीडियावर तिच्या स्पष्टवक्तेपणाचं कौतुक केलं आहे.

News Title: Sonakshi Sinha reveals a fun secret about her mother-in-law for the first time – “She doesn’t know cooking either!”

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now