सोलापूरकरांनो सावधान! आज आणि उद्या ‘रेड अलर्ट’ जारी; NDRF चे पथक शहरात दाखल

On: September 27, 2025 3:54 PM
Solapur Rain Update
---Advertisement---

Solapur Rain Update | सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या रेड अलर्ट (Solapur Red Alert) जारी करण्यात आला आहे. ढगांच्या गडगडाटासह सोलापूर शहरासह ग्रामीण भागात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर एनडीआरएफ ची २ पथके सोलापूर जिल्ह्यात दाखल झाली आहेत.

सोलापूरच्या तापमानात घट :

शनिवार आणि रविवारी ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. शनिवारी अति मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर रविवारी, २८ सप्टेंबर रोजी रात्री १२ नंतर सकाळी ६ वाजेपर्यंत पावसाचा इशारा दिला आहे. ग्लोबल फोरकास्ट सिस्टमने हा रेड अलर्ट दिला आहे. (Solapur Weather Update)

या पावसाने सोलापूरकरांची तारांबळ उडाली. त्यामुळे शुक्रवारी सोलापूरच्या तापमानात मोठी घट झाली. कमाल तापमान 23.6 तर किमान तापमान 23.0 अशं सेल्सिअस नोंदवले गेले.सोलापुरात गुरुवारी रात्रभर आणि शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत पावसाने जोरदार हजेरी लावली.

Solapur Rain Update | कोल्हापूर, सांगलीकडून पथके:

सोलापूर जिल्ह्यासह मराठवाड्यात (Marathwada) पुढील दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर असाच राहिला तर पुढील दोन दिवसात जिल्ह्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

त्यासाठी प्रशासन सज्ज झाले असून बचावकार्यासाठी कोल्हापूर (Kolhapur) आणि सांगलीकडून (Sangli) नवीन पथके बोलावण्यात आली आहेत. सुरक्षेसाठी प्रशासनाने दिलेल्या इशाऱ्यांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले आहे.

प्रशासन सज्ज :

सोलापूर जिल्ह्यातील माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांत महापुरामुळे मोठे नुकसान झाले आहे.

त्यात पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्यास धोका वाढणार आहे. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क असून त्याबाबत संबंधित प्रांताधिकारी आणि तहसिलदार यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

News title : Solapur Rain Update News

Join WhatsApp Group

Join Now