सोलापूरच्या निकालात मोठा ट्विस्ट! आमदाराच्या मुलाचा ११ हजार मतांनी दणदणीत विजय

On: January 16, 2026 1:59 PM
Solapur Election Result
---Advertisement---

Solapur Election Result | सोलापूर महापालिका निवडणुकीत भाजपने बहुमताचा आकडा गाठत मोठं यश मिळवलं आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 मधील निकालाने राज्याचं लक्ष वेधलं असून, आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख (Kiran Deshmukh Win) यांनी तब्बल 11 हजार मतांनी दणदणीत विजय मिळवला आहे. हत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या या प्रभागातील निकाल अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. (Solapur Election Result)

मनसेचे युवा नेते बाळासाहेब सरवदे यांच्या हत्येमुळे या प्रभागात निवडणूक वातावरण तणावपूर्ण होतं. तरीही मतदारांनी भाजप उमेदवारांना मोठा कौल दिल्याचं दिसून आलं असून, प्रभाग 2 मधील भाजपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. त्यामुळे भावनिक मुद्द्यांपेक्षा राजकीय समीकरणांनीच निकालावर प्रभाव टाकल्याचं चित्र आहे.

तुरुंगातून निवडणूक जिंकणाऱ्या उमेदवाराची चर्चा :

प्रभाग 2 क मधील भाजप उमेदवार शालन शिंदे (Shalan shinde) या अटकेत असतानाच निवडणूक लढवत होत्या. विशेष म्हणजे, याच प्रभागात मनसे नेते बाळासाहेब सरवदे यांची हत्या झाली होती. या पार्श्वभूमीवरही शालन शिंदे यांनी सुमारे 4 हजार मतांनी विजय मिळवत राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. (Solapur Election Result)

शालन शिंदे यांच्यासह किरण देशमुख, कल्पना कारभारी आणि नारायण बनसोडे यांनी विजय मिळवत भाजपला प्रभाग 2 मध्ये क्लीन स्वीप दिला आहे. त्यामुळे सोलापूर महापालिकेतील सत्तासमीकरणांमध्ये भाजपची स्थिती अधिक मजबूत झाल्याचं स्पष्ट होत आहे.

Solapur Election Result | मनसेची तीव्र प्रतिक्रिया :

या निकालांवर मनसेने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, हत्या झालेल्या प्रभागात तुरुंगात असलेला उमेदवार निवडून येणं हे समाजासाठी गंभीर विचाराचा विषय असल्याचं मनसेचे लोकसभा प्रमुख प्रशांत इंगळे यांनी सांगितलं आहे. सत्ता आणि पैशांच्या जोरावर निवडणूक लढवली गेल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (Shalan Shinde jail victory)

दरम्यान, सोलापूर महापालिकेत भाजपने बहुमताच्या दिशेने वाटचाल करत शहरातील राजकीय समीकरणांवर स्पष्ट वर्चस्व मिळवलं आहे. उर्वरित प्रभागांचे अधिकृत निकाल जाहीर होताच सोलापूरमधील सत्ता चित्र पूर्णपणे स्पष्ट होणार आहे.

News Title: Solapur Municipal Election Results 2026: MLA’s Son Wins by 11,000 Votes, BJP Candidate Wins from Jail

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now