‘सुशीलकुमार व प्रणिती शिंदे भाजपची बी टीम’; सोलापुरात ठाकरे गटाचा संताप

On: November 21, 2024 8:41 AM
Solapur Constituency Thackeray group alleges Sushilkumar Shinde
---Advertisement---

Solapur Constituency | सोलापूरमध्ये महाविकास आघाडीमध्ये तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. येथे उद्धव ठाकरे गटाने उतरवलेल्या उमेदवाराविरोधात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी बंडखोरी केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. शिंदे कुटुंबाने येथे ठाकरे गटाऐवजी बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर केला. यामुळे सोलपुरात मविआमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. (Solapur Constituency)

शिंदे पिता-पुत्रीच्या या भूमिकेवर ठाकरे गट चांगलाच संतापला आहे. काल राज्यभरात मतदान पार पडले. ऐन मतदानाच्या दिवशी अशी बंडखोरी केल्याने ठाकरे गटाकडून संताप व्यक्त केला जातोय. सोलापूर दक्षिणच्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये रस्सीखेच सुरू होती. या जागेसाठी कॉँग्रेस अगोदरपासूनच इच्छुक होती. मात्र जागा वाटपात अखेर ही जागा शिवसेनेकडे (उद्धव ठाकरे) गेली.

शिंदे कुटुंबियांचा बंडखोर उमेदवारला पाठिंबा

त्यानंतर प्रचारातही महाविकास आघाडीत खटके उडताना दिसून आले. सोलापूर दक्षिण, सोलापूर मध्य, सांगोला अशा मतदारसंघांत काँग्रेस आणि ठाकरे गटाकडून एकमेकांवर टीका करण्यात आली. यावर उद्धव ठाकरे यांनीही नाराजी जाहीर केली होती. सोलापूरात उद्धव ठाकरे प्रचारासाठी आले अस्ताना त्यांनी सभेत जाहीरपणे सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांना आघाडीचा धर्म पाळण्याची आठवण करून दिली होती. (Solapur Constituency)

मात्र, अखेरपर्यंत शिंदे कुटुंबीय, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आघाडीच्या प्रचारात सहभाग घेतला नाही. मतदानाच्या दिवशी तर शिंदे कुटुंबाने थेट बंडखोर उमेदवार धर्मराज काडादी यांना पाठिंबा जाहीर करत तसे मतदान करण्याचे आवाहन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या या भूमिकेवर ठाकरे गट चांगलाच संतापला आहे.

शिंदेंनी ठाकरे गटाचा केसाने गळा कापला-

यावर ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुशीलकुमार शिंदे आणि त्यांच्या कन्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आघाडीचा धर्म बाजूला ठेवून अपक्ष धर्मराज काडादी यांना पाठिंबा देऊन शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचा केसाने गळा कापला, अशा शब्दांत शरद कोळी यांनी संताप व्यक्त केलाय. इतकंच नाही तर, शिंदे कुटुंबीयांनी भाजपशी आतून हातमिळवणी केली असल्याचा आरोपही ठाकरे गटाने केला आहे. (Solapur Constituency)

News Title –  Solapur Constituency Thackeray group alleges Sushilkumar Shinde

महत्त्वाच्या बातम्या-

भाजपला बसणार धक्का, ‘इतक्या’ जागा मिळणंही कठीण?; एक्झिट पोलचा धक्कादायक अंदाज

आज वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग, देवी लक्ष्मी कुणाच्या इच्छा पूर्ण करणार?

परळीत जोरदार राडा, शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला बेदम मारहाण

राज्यात पुन्हा खळबळ! निवडणुकीच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप

शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गट संतापला

Join WhatsApp Group

Join Now