महागाईचा भडका! ‘या’ साबणांच्या किंमती तब्बल ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार

On: November 30, 2024 12:12 PM
Soap Price Increased 
---Advertisement---

Soap Price Increased | देशभरात सध्या अनेक गोष्टींत महागाई झाल्याचं चित्र दिसून येत आहे. एप्रिल-मे महिन्यात पालेभाज्या तसेच टोमॅटो-कांदे-लसूण प्रचंड महाग होते. तर, खाद्यतेलाच्या किमतीमध्येही तब्बल 60 ते 70 टक्क्यांची वाढ झाली. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे बजेट चांगलंच कोलमडत आहे. आता तर दैनंदिन वापराच्या गोष्टी देखील महाग होताना दिसत आहेत. (Soap Price Increased)

पामतेलाच्या दरात वाढ झाल्याने आता साबणाचे भाव वाढले आहेत. काही मीडिया रिपोर्टनुसार, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड आणि विप्रो सारख्या दैनंदिन वापराच्या वस्तू बनवणाऱ्या मोठ्या कंपन्यांनी पाम तेलाच्या किमती वाढल्याचा परिणाम कमी करण्यासाठी साबणाच्या किमतीत वाढ केली आहे.त्यामुळे आता आंघोळ करणेही महाग होणार आहे.

‘या’ साबणाच्या किंमती वाढणार

या कंपन्यांनी साबणांच्या किंमतीमध्ये सुमारे सात ते आठ टक्क्यांनी वाढ केली आहे. या कंपन्यांना पाम तेल, कॉफी आणि कोको यासारख्या वस्तूंच्या वाढत्या किंमतीचा सामना करावा लागला. यामुळे त्यांनी साबणाच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतलाय. (Soap Price Increased)

अलीकडेच HUL आणि Tata Consumer सारख्या कंपन्यांनी चहाच्या किमती वाढवल्या. त्यानंतर आता याच महिन्यात साबणाच्या किमती देखील वाढणार असल्याचं समोर आलंय. पाम तेल हे साबण बनवण्यासाठीचे प्रमुख साधन आहे. यामध्ये वाढ झाल्याने साबणाच्या किमती देखील वाढणार असल्याचं समजतंय.

हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL)कंपनीने चहा आणि त्वचा साफ करणाऱ्या उत्पादनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये डव, लक्स, लाइफबॉय, लिरिल, पीयर्स, रेक्सोना (Dove, Lux, Lifebuoy, Liril, Pierce, Rexona)या उत्पादनांचा समावेश आहे. (Soap Price Increased)

News Title : Soap Price Increased 

महत्वाच्या बातम्या –

एकीकडे एक्स नवऱ्याची हळद तर दुसरीकडे….; समंथा प्रभूवर दु:खाचा डोंगर

धाकधूक वाढली! ‘या’ मतदारसंघाची पुन्हा मतमोजणी होणार?

महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार?, एकनाथ शिंदे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘या’ कारणामुळे राज्यातील थंडीचा जोर वाढणार

महिन्याच्या शेवटी ग्राहकांना दिलासा, सोनं ‘इतक्या’ हजारांनी झालं स्वस्त?

Join WhatsApp Group

Join Now