Skin Care : वाढत्या वयामुळे चेहऱ्यावर दिसणाऱ्या सुरकुत्या आणि कोरड्या त्वचेमुळे महिलांना काळजी वाटू लागते. मात्र, नैसर्गिक आणि घरगुती उपायांनी त्वचा पुन्हा तरुण व टवटवीत ठेवता येते. नियमितपणे घरच्या घरी तयार केलेले फेसपॅक वापरल्यास त्वचेला पोषण मिळते, कोरडेपणा दूर होतो आणि सुरकुत्याही कमी होतात.
घरगुती उपाय
वयाच्या तिशीनंतर त्वचेतील कोलाजेनचं प्रमाण कमी होऊ लागते, ज्यामुळे त्वचा सैल होते आणि सुरकुत्या दिसू लागतात. या समस्यांवर उपचार करण्यासाठी अनेक महिला बाजारातील महागडी उत्पादने वापरतात. मात्र, ही उत्पादने त्वचेला सूट न झाल्यास परिणाम उलट होऊ शकतो. म्हणूनच घरगुती आणि नैसर्गिक उपाय अधिक प्रभावी ठरतात.
काकडी आणि दही यांचा फेसपॅक हा त्वचेच्या हायड्रेशनसाठी उत्कृष्ट मानला जातो. काकडीमध्ये भरपूर पाण्याचं प्रमाण असल्याने त्वचा थंड राहते आणि ताजगी मिळते. काकडी किसून त्यात दोन चमचे दही मिसळा. ही पेस्ट चेहरा आणि मानेवर लावून १५ मिनिटं ठेवा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावल्यास त्वचा हायड्रेटेड राहते आणि तरुण दिसते.
बेसनचा फेसपॅक
बेसन हे त्वचेसाठी अत्यंत गुणकारी असून, मुरूम, डाग, आणि सैल त्वचेसाठी फायदेशीर ठरते. एक वाटी बेसन घेऊन त्यात दोन चमचे दही आणि एक चमचा गुलाबपाणी मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि १५ मिनिटांनी पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. यामुळे त्वचा घट्ट होते आणि नैसर्गिक चमक वाढते.
त्वचा अधिक काळ तरुण ठेवण्यासाठी महत्त्वाचे टिप्स
- दररोज सकस आहार घ्या आणि भरपूर पाणी प्या.
- तेलकट आणि मसालेदार पदार्थांचे प्रमाण मर्यादित ठेवा.
- त्वचेला नियमित मॉइश्चरायझ करा.
- घरगुती फेसपॅक आठवड्यातून दोनदा लावा.
- सनस्क्रीनचा नियमित वापर करा.
- या सोप्या आणि प्रभावी घरगुती उपायांनी तुमची त्वचा सुरकुत्यांपासून दूर राहील आणि अधिक तरुण व उजळ वाटेल.






