₹1000 च्या SIP तून करोडपती होणं शक्य आहे का?, जाणून घ्या गणित

On: October 20, 2025 12:40 PM
PPF Scheme
---Advertisement---

Mutual Fund | म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणुकीसाठी एसआयपी (SIP) हा एक लोकप्रिय आणि सोपा मार्ग आहे. अगदी ५०० ते १००० रुपयांसारख्या कमी रकमेतूनही दरमहा गुंतवणूक करता येते. सुरक्षित परताव्यामुळे तरुणांमध्ये एसआयपीची क्रेझ वाढत आहे. पण अनेकांना प्रश्न पडतो की, दरमहा फक्त १००० रुपये गुंतवून करोडपती बनता येते का?

एसआयपी परतावा कसा मोजतात? :

एसआयपीमधून मिळणारा परतावा मोजण्याचे एक विशिष्ट सूत्र असते, परंतु ते सामान्य गुंतवणूकदारांसाठी थोडे किचकट असू शकते. यामध्ये तुम्ही किती काळ गुंतवणूक केली, एकूण किती रक्कम गुंतवली आणि अपेक्षित परताव्याचा दर अशा अनेक गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. या आधारावरच मुदतपूर्तीनंतर मिळणाऱ्या संभाव्य रकमेचा अंदाज येतो.

मात्र, हे गणित स्वतः करणे वेळखाऊ आणि अवघड असू शकते. म्हणूनच, अनेक आर्थिक वेबसाइट्सवर ‘एसआयपी कॅल्क्युलेटर’ (SIP Calculator) उपलब्ध आहेत. या कॅल्क्युलेटरच्या मदतीने तुम्ही गुंतवणुकीची रक्कम, कालावधी आणि अपेक्षित परतावा दर टाकून, भविष्यात अंदाजे किती निधी जमा होऊ शकतो, याची सहज कल्पना मिळवू शकता.

Mutual Fund | ₹1000 दरमहा गुंतवून करोडपती बनणे शक्य आहे? :

दरमहा फक्त १००० रुपये गुंतवून करोडपती होण्याचे स्वप्न अनेकजण पाहतात. पण हे गणित वाटते तितके सोपे नाही. समजा, तुम्ही वयाच्या २७ व्या वर्षी दरमहा १००० रुपयांची एसआयपी सुरू केली आणि वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत (३३ वर्षे) ती चालू ठेवली. तर १५% वार्षिक परतावा मिळाल्यास तुमच्याकडे १.१० कोटी रुपये जमा होऊ शकतात. मात्र, सलग ३३ वर्षे दरवर्षी १५% परतावा मिळणे हे बाजारातील स्थिती पाहता अत्यंत कठीण आणि जवळपास अशक्य आहे.

दुसरीकडे, जर तुम्हाला १० वर्षांत १ कोटी रुपयांचा निधी हवा असेल, तर तुम्हाला दरमहा सुमारे ४४,००० रुपयांची एसआयपी करावी लागेल (१२% सरासरी परतावा गृहीत धरून). हे आकडे केवळ अंदाज आहेत. एसआयपी परतावा बाजारातील चढ-उतारांवर अवलंबून असतो. त्यामुळे, एसआयपीतून कमी गुंतवणुकीत झटपट करोडपती होणे शक्य नाही. गुंतवणूक नेहमी अभ्यास करून आणि सावधगिरीनेच करावी.

News title : SIP Math: ₹1000 Monthly to ₹1 Crore?

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now