मुंग्यासारख्या गाड्या, 4 तास भयंकर ट्रॅफिक जाम; उड्डाण पुलाचं उद्घाटन रखडल्याने पुणेकर संतापले

On: April 28, 2025 3:09 PM
Pune Traffic News
---Advertisement---

Sinhagad Road | पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावर वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. विठ्ठलवाडी (Vitthalwadi) ते फनटाईम थिएटर (Funtime Theatre) दरम्यानचा उड्डाणपूल बांधून पूर्ण झाला असला तरी, तो अद्याप वाहतुकीसाठी खुला न केल्याने, विशेषतः राजाराम पूल (Rajaram Bridge) ते वडगाव पुलादरम्यान (Vadgaon Bridge) नागरिक दररोज नरकयातना भोगत आहेत. सोमवारी सकाळी झालेल्या भयंकर वाहतूक कोंडीला पुणेकर वैतागल्याचं पाहायला मिळालं.   

राजाराम पूल ते वडगाव पूल

सिंहगड रस्त्यावरील (Sinhagad Road) उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन अनेक दिवस उलटले आहेत. डांबरीकरण, रंगरंगोटी अशी सर्व कामे झाली असून पूल वाहतुकीसाठी सज्ज दिसत आहे. मात्र, प्रशासनाकडून तो खुला करण्यात आलेला नाही. याचा थेट परिणाम म्हणजे राजाराम पूल (Rajaram Bridge) ते वडगाव पूल या पट्ट्यात दररोज सकाळी आणि सायंकाळी प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे.

या भागात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून, काही मिनिटांचे अंतर कापण्यासाठी तासन् तास लागत आहेत. नोकरदार, विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना याचा मोठा फटका बसत असून, वेळेचा आणि इंधनाचा अपव्यय होत आहे. तयार पूल केवळ उद्घाटनाच्या प्रतीक्षेत धूळ खात पडून असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे.

उद्घाटनाला विलंब का?

उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊनही तो वाहतुकीसाठी का खुला केला जात नाही, याचे नेमके कारण अद्याप प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. उद्घाटनासाठी राजकीय मुहूर्त शोधला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. मात्र, या विलंबाचा फटका सर्वसामान्य पुणेकरांना (Punekars) बसत आहे.

वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, उड्डाणपूल तात्काळ वाहतुकीसाठी खुला करावा, अशी जोरदार मागणी होत आहे. प्रशासनाने आतातरी यावर तातडीने निर्णय घेऊन नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अन्यथा, नागरिकांचा संताप आणखी वाढण्याची शक्यता आहे.

News Title- Sinhagad Road Flyover Ready, Traffic Woes Continue

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now