Amruta Fadnavis | राज्यात सध्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठी चर्चा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याबद्दल प्रसिद्ध गायिका अंजली भारती हिने केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. भंडारा जिल्ह्यात झालेल्या भीम मेळाव्यात (Bhim Melava) अंजलीने केलेल्या भाषणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी अनेक स्तरांतून होत आहे. (Anjali Bharti Controversy)
मिळालेल्या माहितीनुसार, 13 जानेवारी रोजी झालेल्या कार्यक्रमात अंजली भारती (Anjali Bharti) हिने बालिकांवरील अत्याचार आणि बलात्काराच्या घटनांवर तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला. मात्र, या विषयावर बोलताना तिने अमृता फडणवीस यांच्याबद्दलही अनावश्यक आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप होत आहे. या वक्तव्यामुळे सामाजिक माध्यमांवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या असून, अनेकांनी याला निषेधार्ह आणि असंवेदनशील ठरवलं आहे.
भीम मेळाव्यात काय घडलं? :
भंडाऱ्यातील भीम मेळाव्यात अंजली भारती हिने महिलांवरील अत्याचारांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मात्र, यावेळी बोलताना तिची जीभ घसरल्याचे सांगितले जात असून, तिने अमृता फडणवीस यांचे नाव घेत अपमानास्पद आणि आक्षेपार्ह शब्दप्रयोग केल्याचा आरोप होत आहे. या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर, राजकीय कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि सामान्य नागरिकांकडून तिच्यावर कारवाईची मागणी सुरू झाली आहे.
या घटनेनंतर “महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर विषयावर बोलताना कुणाच्याही बद्दल अशा प्रकारचे वक्तव्य करणं योग्य नाही,” अशी भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. काही संघटनांनी पोलिसांत तक्रार दाखल करण्याची तयारी दर्शवली असून, या प्रकरणावर पुढे काय कारवाई होते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Amruta Fadnavis | सोशल मीडियावर संताप, कायदेशीर कारवाईची मागणी :
अंजली भारतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका सुरू झाली आहे. अनेकांनी हे वक्तव्य महिलांच्या सन्मानाविरोधात असल्याचं म्हटलं आहे. काही जणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मर्यादा ओलांडल्या गेल्याचा आरोप केला आहे, तर काहींनी कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली आहे. (Anjali Bharti Controversy)
दरम्यान, या प्रकरणी अधिकृत प्रतिक्रिया किंवा पोलिसांकडून कारवाईची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, राजकीय वर्तुळातही यावर चर्चा सुरू असून, विविध पक्षांच्या नेत्यांनी या घटनेचा निषेध केला आहे.






