Baba Siddique | राज्याचे माजी राज्यमंत्री तथा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique Shot Dead) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतलं आहे.
मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आरोपींची कसून चौकशी केली. या चौकशीत दोन्ही आरोपींनी धक्कादायक कबुलीजबाब दिला. बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्याआधीच्या एक दिवसाआधीच डिलिव्हरी बॉयकडून पिस्तुल पुरवण्यात आलं.
बाबा सिद्धीकी यांच्या हत्येप्रकरणी मुंबई पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. करनैल सिंह (हरियाणा), धर्मराज कश्यप (उत्तर प्रदेश) अशी या दोन्ही आरोपींची नावे आहेत. तर, तिसऱ्या आरोपीची ओळख पटली आहे. बाबा सिद्धिकी यांच्यावर गोळीबार करण्यासाठी तिन्ही आरोपी हे रिक्षाने घटनास्थळी आले.
दोन्ही आरोपींनी बाबा सिद्दीकी यांच्या घराची आणि कार्यालयाच्या परिसराची रेकी केली होती. आरोपी जवळपास दीड ते दोन महिन्यापूर्वी मुंबईत आले होते. आरोपी मागील काही दिवसापासून कुर्ला परिसरात वास्तव्यास होते.
बाबा सिद्दिकी यांचे मारेकरी हे बिष्णोई गँगशी संबंधित असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या चौकशीत ही माहिती समोर आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागे कोणती कारणे असतील, याचा शोध सुरू होता. संशयाची सुई लॉरेन्स बिष्णोई टोळीकडे होती. आता आरोपींचा संबंध या टोळीशी असल्याने पोलिसांचा तपासही त्याच दिशेने सुरू होणार आहे.
बाबा सिद्दिकी यांच्यावर मुस्लीम धर्मानुसार अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबा सिद्दीकी यांचे पार्थिव मारिन लाईन येथील बडा कब्रस्तान येथे आणले जाईल. रात्री 8.30 वाजता त्यांच्या पार्थिवावर दफनविधी होईल.
महत्त्वाच्या बातम्या-
बाबा सिद्दीकींच्या हत्ये मागे या गँगचा हाथ? माहिती समोर येताच सगळीकडे खळबळ
सिद्दीकींना गोळी मारण्यामागचं धक्कादायक कारण समोर
ब्रेकिंग न्यूज! राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या
अजित पवार गटाच्या ‘या’ आमदाराने केली रावणाची महाआरती!
मी राजकारणाला चिटकून बसणारी नाही…पंकजा मुंडे फक्त एकाच गोष्टीला घाबरते






