Shweta Tiwari | टीव्ही इंडस्ट्रीत दीर्घ काळापासून सक्रिय असलेली श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आता ४४ वर्षांची झाली असूनही तिचा ग्लॅमर आणि लोकप्रियता अजिबात कमी झालेली नाही. सोशल मीडियावरही तिचा प्रभाव जबरदस्त असून ती वेळोवेळी फोटो आणि व्हिडिओद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधते. अलीकडेच तिने शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे सोशल मीडियावर प्रचंड चर्चा रंगली आहे, कारण त्या व्हिडिओत ती थेट कॅमेऱ्यासमोर कपडे बदलताना दिसते.
श्वेताचा ग्लॅमरस अंदाज व्हिडिओत उघड
श्वेता (Shweta Tiwari) तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक रील शेअर केली आहे ज्यामध्ये ती सुरुवातीला बाथरोबमध्ये दिसते. काही क्षणातच ती कॅमेऱ्याकडे पाहताच तिचे कपडे बदलतात आणि ती एक सुंदर रेड ऑफ-शोल्डर गाऊनमध्ये झळकते. डीप नेक डिझाइन असलेल्या या गाऊनमध्ये श्वेताचा सौंदर्यसाज अधिक खुलून आला आहे. या लूकला तिने सिल्व्हर नेकपीस आणि कर्ल केलेल्या केसांनी पूर्णत्व दिले आहे. व्हिडिओत ती हसत-हसत गाऊन फ्लॉन्ट करत कॅमेऱ्यासमोरून जाते. कॅप्शनमध्ये श्वेताने लिहिले आहे, “प्लास्टिक? नाही, शानदार…!!!! अगदी….”
View this post on Instagram
या प्रकारच्या ट्रांझिशन व्हिडिओजमुळे श्वेता नेहमी चर्चेत असते. ती वेळोवेळी तिच्या स्टाईल आणि अदा यामुळे सोशल मीडियावर आग लावत असते. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी प्रचंड प्रतिक्रिया दिल्या असून, अनेकांनी तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक केलं आहे.
चाहत्यांकडून व्हिडिओवर दमदार प्रतिक्रिया
श्वेता (Shweta Tiwari) तिवारीच्या या व्हिडिओवर चाहते वेगवेगळ्या प्रकारे कमेंट करत आहेत. काही जण तिच्या सौंदर्याने भारावून गेले आहेत, तर काहींनी मजेशीर प्रतिक्रिया देत ट्रोलही केलं आहे. एका युजरने लिहिलं, “कोणी इतकं गोंडस कसं असू शकतं?” तर दुसऱ्याने म्हटलं, “ब्युटीफुल, सिझलिंग, सेन्शुअल.” याशिवाय अनेकांनी ‘फायर’ आणि ‘हार्ट’ इमोजीने व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, श्वेताचं नाव सध्या ‘नागिन ७’ या आगामी मालिकेशी जोडलं जात आहे. तिचा नागिन लूक सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल झाला आहे. चाहत्यांनीही त्या लूकचं भरभरून स्वागत केलं आहे. त्यामुळे श्वेता तिवारी पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर झळकणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले आहे.






