घायवळ प्रकरणी योगेश कदम फसले! ‘गुन्हे नव्हते’ म्हणताच सुषमा अंधारेंनी पुरावेच दिले, नेमकं काय घडलं?

On: October 9, 2025 3:31 PM
Shushma Andhare
---Advertisement---

Sushma Andhare | राज्यातील गृहराज्यमंत्री योगेश कदम (Yogesh Kadam) यांच्यावर शस्त्र परवाना प्रकरणानं वादंग माजवलं आहे. पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला योगेश कदम यांनी शस्त्र परवाना मंजूर केला, या प्रकरणावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Shushma Andhare) यांनी थेट पुरावे देत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.

सुषमा अंधारे म्हणाल्या, “सचिन घायवळवर केवळ खुनाचेच नव्हे, तर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल होते. पोलिसांनी स्पष्टपणे म्हटलं होतं की अशा व्यक्तीला शस्त्र परवाना देऊ नये. तरी देखील योगेश कदम यांनी स्वतःच्या अधिकारांचा वापर करून त्याला परवाना मंजूर केला. हे अत्यंत गंभीर आहे.”

“योगेश कदमांनी काय सांगितलं?”

प्रकरण उघड झाल्यानंतर योगेश कदम (yogesh Kadam) यांनी ट्विटद्वारे स्वतःचं स्पष्टीकरण दिलं होतं. त्यांनी म्हटलं, “सुनावणीच्या दिवशीपर्यंत सचिन घायवळ यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंबित नव्हते. न्यायालयाने निर्दोष मुक्ततेचा आदेश दिला होता. त्यामुळे नियमानुसार त्यांना शस्त्र परवाना देण्यात आला.”

कदम यांनी पुढे स्पष्ट केलं की, “सद्य प्रकरणाशी इतर प्रकरणांची सांगड घालणं चुकीचं आहे. माझ्या निर्णयाला दिशाभूल करणारी वळणं दिली जात आहेत.”

मात्र अंधारेंनी हे स्पष्टीकरण फेटाळून लावत म्हटलं, “पोलिसांच्या अहवालात गुन्हे स्पष्ट नमूद आहेत. तरी देखील कदम यांनी हा अहवाल दुर्लक्षित केला. म्हणजेच त्यांनी जाणूनबुजून गुन्हेगाराला संरक्षण दिलं.”

Sushma Andhare | “कदमांना पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही” :

सुषमा अंधारे यांनी आरोप केला की, “योगेश कदम यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करून एका गुंडाला अभय देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना गृहराज्यमंत्री पदावर राहण्याचा नैतिक अधिकार उरलेला नाही. त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.” (Shushma Andhare on Yogesh Kadam)

अंधारेंनी आपल्या ट्विट पोस्टमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग करत म्हटलं, “सरकार गुन्हेगारांच्या बाजूने उभं राहतंय का? जनतेला याचं उत्तर मिळालंच पाहिजे.”

पुण्यातील घायवळ टोळीवर पोलिसांची कारवाई :

दरम्यान, निलेश घायवळ परदेशात पळाल्यानंतर पुणे पोलिसांनी त्याच्या टोळीवर मोठी कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी पुणे आणि अहिल्यानगरमधील घरांवर छापेमारी करत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता, कागदपत्रं आणि जिवंत काडतूस जप्त केल्याचं समोर आलं आहे.

या पार्श्वभूमीवर सचिन घायवळला शस्त्र परवाना मंजूर केल्याने प्रशासनावरचं अविश्वासाचं संकट वाढलं आहे.

News Title: Shushma Andhare Demands Yogesh Kadam’s Resignation; Produces Evidence in Ghaywal Gun License Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now