येत्या 48 तासांत ‘या’ ५ राशींवर पडणार पैशांचा पाऊस!

On: October 7, 2025 1:07 PM
Astrology
---Advertisement---

Shukra Gochar 2025 | वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार येणारा 9 ऑक्टोबर 2025 चा दिवस अनेक राशींसाठी खास मानला जात आहे. सौंदर्य, प्रेम, कला आणि वैभवाचा अधिपती असलेला शुक्र ग्रह आता कन्या राशीत प्रवेश करणार आहे. या शुक्र गोचरामुळे (Shukra Gochar 2025) काही राशींवर देवी लक्ष्मीची कृपा होणार असून आर्थिक आणि वैयक्तिक जीवनात आनंदाची बरसात होईल.

या परिवर्तनाचा प्रभाव येणाऱ्या दिवाळीच्या काळात अधिक तीव्र जाणवेल. काही राशींना अनपेक्षित आर्थिक लाभ, नवीन संधी, आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा दिसून येईल. चला जाणून घेऊया कोणत्या राशींचं भाग्य उजळणार आहे.

मिथुन, सिंह आणि वृश्चिक राशींसाठी शुभ काळाची सुरुवात :

मिथुन राशी (Gemini Horoscope) : शुक्र ग्रहाचं संक्रमण मिथुन राशीच्या दुसऱ्या चरणात होत असून, हा काळ कुटुंबासाठी अत्यंत आनंददायी ठरेल. घरात सुख-शांती वाढेल, आणि वातावरणात सकारात्मक ऊर्जा दिसेल. नवीन वाहन खरेदी किंवा घरगुती गुंतवणुकीसाठी हा काळ अनुकूल आहे. तुमच्या वाणीतील गोडवा आणि आकर्षक व्यक्तिमत्त्वामुळे लोक तुमच्याकडे आकर्षित होतील.

सिंह राशी (Leo Horoscope) : या राशीसाठी शुक्राचे संक्रमण करिअर आणि प्रतिष्ठेसाठी फायदेशीर ठरणार आहे. नोकरीत बढती, रखडलेले पैसे परत मिळणे, आणि मुलांच्या प्रगतीची चिन्हं दिसतील. तसेच, वैयक्तिक आयुष्यातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील. सर्जनशील क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी हा काळ विशेष प्रेरणादायी ठरेल.

Shukra Gochar 2025 | वृश्चिक, धनु आणि मीन राशींवर लक्ष्मीदेवीची कृपा :

वृश्चिक राशी (Scorpio Horoscope) : हा काळ आर्थिकदृष्ट्या समृद्धीचा संकेत देतो. समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल, आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने धनवृद्धी होईल. अविवाहितांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात, तर विवाहितांना कौटुंबिक सुख लाभेल.

धनु राशी (Sagittarius Horoscope) : शुक्र गोचर धनु राशीसाठी करिअर विस्तार आणि नवीन सुरुवातींचा काळ घेऊन येत आहे. या काळात तुम्ही नवीन लोकांशी ओळख निर्माण कराल, व्यवसायाच्या संधी मिळतील आणि दीर्घकाळ अडकलेले प्रकल्प मार्गी लागतील. उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे.

मीन राशी (Pisces Horoscope) : शुक्राचे संक्रमण या राशीच्या जातकांसाठी प्रेम, रोमॅन्स आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येत आहे. विवाहितांसाठी नात्यात सामंजस्य वाढेल, आणि अविवाहितांना जोडीदार मिळण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळाल्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होऊ शकते.

News Title: Venus Transit 2025 in Virgo: These Zodiac Signs Will See Wealth and Love Blessings Before Diwali | Shukra Gochar 2025 Astrology

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now