Shubman Gill Century l बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यात भारताचा युवा खेळाडू शुभमन गिलने दमदार कामगिरी करत शतक झळकावले आहे. शुभमन गिलचे टीम इंडियासाठीचे हे पाचवे कसोटी शतक आहे. चेन्नई सुरु असलेल्या कसोटीच्या पहिल्या डावात शुभमनला विशेष काही करता आले नाही. पण दुसऱ्या डावात त्याने दमदार कामगिरी केली आहे.
शुभमन गिलने केलं रेकॉर्ड ब्रेक :
टीम इंडियाच्या दुसऱ्या डावात शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला होता. या काळात त्यानी दमदार कामगिरी केली आहे. गिलने ऋषभ पंतसोबत शतकी भागीदारी केली आहे. मात्र यानंतर पंत बाद झाला. तर दुसऱ्या डावात भारतीय संघाने 61 षटकांत 4 गडी गमावून 263 धावा केल्या.
शुभमन गिलने आतापर्यंत 12 आंतरराष्ट्रीय शतके झळकावली आहेत. त्याने कसोटीत 5 शतके झळकावली आहेत. याशिवाय त्याने एकदिवसीय सामन्यात 6 शतके आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात एक शतक झळकावले आहे.
Shubman Gill Century l गिल पहिल्या डावात शून्यावर बाद :
भारतीय संघाने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. यावेळी गिल शून्यावर बाद झाला. पण दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावले. टीम इंडियाने दुसऱ्या डावात 62 षटकांत 4 गडी गमावून 270 धावा केल्या होत्या. अशा प्रकारे भारताने 497 धावांची आघाडी घेतली आहे.
अशातच आता शुभमन गिलने एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. गिल 2024 मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज ठरला आहे. शुभमनने या वर्षात 3 शतके झळकावली आहेत. यावेळी त्याने रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांना मागे टाकले आहे. यशस्वी आणि रोहितने प्रत्येकी 2 शतके झळकावली आहेत. त्यामुळे शुभमन त्याच्या पुढे गेला आहे.
News Title : Shubman Gill Century
महत्त्वाच्या बातम्या-
एअरटेलने ग्राहकांना दिलं दिवाळी गिफ्ट! सर्वात स्वस्त प्लॅन लाँच
पुणे हादरलं! मध्यरात्री 1 वाजता दरवाजा ठोठावला अन्…; पुढचा घटनाक्रम ऐकून थरथराल
महाराष्ट्रात 3 वंदे भारत एक्स्प्रेस सुरु, ‘या’ जिल्ह्यांना जोडणार
‘या’ चित्रपटामध्ये भारुडातून दाखवली राजकीय स्थिती; ’50 खोके’ अन् बरच काही
तिरुपती बालाजी प्रसादाच्या लाडूत ‘या’ जनावरांची चरबी अन् माशाचे तेल; राम मंदिरात वाटप






