ऐतिहासिक क्षण! शुभांशु शुक्लांनी रचला इतिहास, मोदींकडून कौतुक!

On: June 25, 2025 1:56 PM
Shubhanshu Shukla
---Advertisement---

Shubhanshu Shukla | भारतीय हवाई दलातील ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला यांनी आज इतिहास रचला आहे. त्यांनी स्पेसएक्सच्या Axiom-4 (Ax-4) मोहिमेसोबत अंतराळात यशस्वी उड्डाण केलं असून, ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) जाणाऱ्या पहिल्या भारतीय अंतराळवीरांपैकी एक ठरणार आहेत. या ऐतिहासिक क्षणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही शुक्ला यांचं अभिनंदन केलं आहे.

स्पेसएक्सच्या 53व्या ड्रॅगन मिशनचं यशस्वी प्रक्षेपण :

Axiom-4 ही स्पेसएक्सची 53वी ड्रॅगन मोहीम आणि 15वी मानवी अंतराळ मोहीम असून, यात चार देशांचे अंतराळवीर सहभागी आहेत:

???????? शुभांशु शुक्ला (भारत)

???????? पेगी व्हिटसन (यूएसए) – कमांडर

???????? स्लाव्होस उजनांस्की (पोलंड)

???????? टिबोर कापू (हंगेरी)

स्पेसएक्सने आज दुपारी 12:01 वाजता (IST) या मोहिमेचं यशस्वी प्रक्षेपण केलं. हवामान 90% अनुकूल असल्यामुळे अनेकवेळा पुढे ढकललेली मोहीम अखेर पार पडली.

Shubhanshu Shukla | कोण आहेत शुभांशु शुक्ला? :

उत्तर प्रदेशातील लखनऊचे रहिवासी शुभांशु शुक्ला हे सिटी मॉन्टेसरी स्कूलमधून शिक्षण घेतल्यानंतर राष्ट्रीय संरक्षण अकादमी (NDA) तर्फे भारतीय हवाई दलात भरती झाले. 2006 पासून लढाऊ पायलट म्हणून कार्यरत असलेले शुक्ला यांच्याकडे मिग-21, मिग-29, सुखोई-30MKI, जग्वार, हॉक यांसारखी विमाने उडवण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. 2024 मध्ये त्यांना ग्रुप कॅप्टन पद मिळाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच या मोहिमेद्वारे भारताने आंतरराष्ट्रीय स्तरावर मानवी अंतराळ प्रवासात एक नवा टप्पा गाठला आहे. इस्रोच्या गगनयान मोहिमेच्या पार्श्वभूमीवर ही कामगिरी भारताच्या जागतिक अंतराळ क्षेत्रातील उंची अधोरेखित करते.

News Title: Shubhanshu Shukla Makes History: Becomes First Indian on Axiom-4 SpaceX Mission to ISS

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now