Shubhangi Atre | ‘भाभीजी घर पर है’ (Bhabhiji Ghar Par Hai) या मालिकेतून ‘अंगूरी भाभी’ म्हणून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शुभांगी अत्रे (Shubhangi Atre) सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल केलेल्या एका खुलाश्यामुळे चर्चेत आहे. तिचा पूर्वाश्रमीचा पती पियुष पुरे (Piyush Pure) याचे एप्रिल महिन्यात निधन झाले होते. त्याच्या निधनाच्या काही काळ आधीच त्या दोघांचा घटस्फोट झाला होता. आता एका मुलाखतीत शुभांगीने त्यांच्या नात्यातील अनेक गोष्टींवर भाष्य केले आहे.
नक्की काय आहे प्रकरण?
सिद्धार्थ कन्ननला (Siddharth Kannan) दिलेल्या मुलाखतीत शुभांगीने सांगितले की, लग्नानंतर तिला पियुषच्या दारूच्या व्यसनाबद्दल माहिती मिळाली. “मी आमचं १७ वर्षांचं लग्न टिकवण्यासाठी खूप प्रयत्न केले. मी कामात व्यस्त असल्याने परिस्थिती कधी बिघडली हे कळलंच नाही. माझी मुलगी आशी (Aashi) मला त्याच्या दारू पिण्याबद्दल सांगायची. पण कोविडचा काळ माझ्यासाठी डोळे उघडणारा ठरला, जेव्हा मी घरी राहून हे सर्व स्वतः पाहिलं,” असे तिने सांगितले.
शुभांगी (Shubhangi Atre) पुढे म्हणाली की, २०१८ मध्ये पियुष एका ट्रान्सप्लांट उपचारासाठी स्टिरॉइड्स घेत होता आणि त्याचबरोबर त्याने दारू पिणेही सुरू ठेवले होते, ज्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. “मी त्याला दोन वर्षे पुनर्वसन केंद्रात (rehabilitation center) जाण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न केला. पण त्याचा माझ्यावर मानसिक परिणाम होत होता, म्हणून आम्ही २०२० मध्ये वेगळे झालो,” असे तिने स्पष्ट केले.
तरीही त्याने दारू पिणे थांबवले नाही-
घटस्फोटानंतरही आपण पियुषला आर्थिक मदत करत होतो, पण तरीही त्याने दारू पिणे थांबवले नाही, अशी खंतही तिने व्यक्त केली. या मुलाखतीत, जेव्हा तिला विचारण्यात आले की तिला तिच्या पूर्वाश्रमीच्या पतीची आठवण येते का, तेव्हा ती भावुक झाली आणि “कधीकधी येते,” असे उत्तर दिले.
News Title – Shubhangi Atre on Late Ex-Husband’s Alcoholism






