Eknath Shinde l विधानसभा निवडणुकीत महायुतीने बहुमत मिळवून पुन्हा एकदा पुनरागमन केलं आहे. त्यानंतर सत्ता वाटपाचा तिढा काही दिवस सुटला नसल्याने राजकीय वर्तुळात तर्क वितर्क वर्तवले जात होते. मात्र त्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्तार झाला त्यानंतर खातेवाटपही झालं. मात्र आता शिवसेनेच्या शिंदे गटातील खासदाराने थेट गृह खात्यावर लेटर बॉम्ब डागला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीत असलेल्या खात्यावर प्रचंड आरोप झाल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
श्रीरंग बारणेंनी गृहखात्यावर केले मोठे आरोप :
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बंडात साथ देणारे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी थेट राज्याच्या गृह विभागावर निशाणा साधला आहे. कारण पिंपरी चिंचवडचे पोलीस हप्ते वसुली करत असल्याचा गंभीर आरोप खासदार श्रीरंग बारणे यांनी केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे.
यावेळी खासदार श्रीरंग बारणे यांनी एक पत्र लिहलं आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सध्या गृह खातं आहे, असं असूनही पिंपरी चिंचवड पोलीस नागरिकांना कोणत्याही प्रकारची दाद देत नाहीत, तसेच तक्रारी दाखल करून घेत नाहीत आणि हफ्ते वसुली करून वरिष्ठांना देतात असं लेखी पत्र देत खासदार श्रीरंग बारणे यांनी पिंपरी चिंचवड पोलीस आणि राज्याच्या गृहविभागाच्या कारभारावर थेट बोट ठेवल आहे.
Eknath Shinde l भाजप आणि शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर येणार? :
खासदार श्रीरंग बारणे हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. मात्र आता त्यांनी केलेल्या या आरोपामुळे भाजप आणि शिवसेनेतील खदखद चव्हाट्यावर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. तसेच या धक्कादायक प्रकरणाकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गांभीर्याने लक्ष देतात का? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर देखील हप्ता वसुलीचा आरोप करण्यात आला होता. तसेच अनिल देशमुख यांच्यावर आरोपांची राळ देखील उडवण्यात आली होती. कारण पोलिसांना तब्ब्ल 100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आल्याचा आरोप अनिल देशमुखांवर करण्यात आला होता.
News Title – shrirang barne wrote letter about hapta vasooli police pimpri chinchwad
महत्त्वाच्या बातम्या-
संतोष देशमुखांच्या हत्येविरोधात विरोधक प्रचंड आक्रमक! घेतला सर्वात मोठा निर्णय
शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! मुख्यमंत्र्यांनी महत्त्वपूर्ण योजनेची केली घोषणा
“संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं”; नवीन खुलासा समोर
“1500 रुपये देण्यासाठी बहीणींच्या नवरे व भावांना बेवडे बनवणार”; ‘या’ नेत्याचा हल्लाबोल
लाडक्या बहिणींच्या अर्जांची छाननी होणार का? आदिती तटकरेंनी दिलं उत्तर






