श्रीकांत शिंदे होणार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री?; ‘या’ बड्या नेत्याच्या गौप्यस्फोटाने खळबळ

On: November 27, 2024 3:02 PM
Shrikant Shinde
---Advertisement---

Shrikant Shinde | राज्याच्या राजकारणात वातावरण तापल्याचं चित्र पहायला मिळत आहे. महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री कोण होणार? याकडे संपूर्ण जनेतेचं तसंच राजकारणातील नेते मंडळींचं लक्ष लागलं आहे. नियमानुसार निवडणुकीच्या निकालानंतर पुढच्या 48 तासात नव्या मुख्यमंत्रीची घोषणा करणं गरजेचं आहे.

मात्र, निवडणूकीचा निकाल लागून काही दिवस उलटून गेले तरी अद्याप मुख्यमंत्री कोण असणार हे समोर आलेलं नाहीये. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा केला असला तरी, भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जात आहे. तर दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार असल्याचं बोललं जात आहे. यावर शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिलीये.

 काय आहे प्रकरण?

शिवसेना शिंदे (Shrikant Shinde) गटाचे नेते, आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलत असताना श्रीकांत शिंदे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. ते इथे येणार नाहीत. या बातम्या खोट्या आहेत, असं संजय शिरसाट म्हणालेत.

संजय शिरसाट हे एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मंत्रिपदासाठी कुठलीही लॉबिंग नाही. मी सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो होतो. मुख्यमंत्रिपदासाठी अद्याप कुणालाही फोन आलेला नाही. फोन कधी आणि कुणाला येणार हे अद्याप सांगता येणार नाही, अशी माहिती शिरसाट यांनी दिली.

…तर श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री?

भाजपने मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद किंवा केंद्रात मंत्रिपदाची ऑफर शिंदेंना दिल्याची माहिती आहे. या सगळ्यात जर शिंदे गटाने उपमुख्यमंत्रिपद घेण्याचं मान्य केलं. तर एकनाथ यांचे पुत्र श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) हे उपमुख्यमंत्री होतील अशी चर्चा रंगली आहे. दरम्यान, सध्या महाराष्ट्राला कोण मुख्यमंत्री मिळणार याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.

News Title : shrikant shinde to be deputy chief minister of maharshtra

महत्त्वाच्या बातम्या-

लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी! ‘या’ तारखेपासून 2100 रुपये मिळणार

सावधान! हिवाळ्यात पसरतोय ‘हा’ धोकादायक आजार?

मुख्यमंत्री पदावरून नुसता गोंधळ, राष्ट्रवादीच्या नेत्याने शिंदे गटाची झोपच उडवली

राज्यातील ‘या’ विधानसभा मतदारसंघात पुन्हा होणार मतमोजणी

थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now