Ambanis Shocked | आयपीएल 2025 च्या क्वालिफायर-2 सामन्यात पंजाब किंग्जने मुंबई इंडियन्सचा 5 विकेट्सनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या विजयामागे सर्वात मोठा हातभार ठरला श्रेयस अय्यरचा (Shreyas Iyer), ज्याने संकटाच्या क्षणी जबाबदारी स्वीकारत नाबाद 87 धावांची दणदणीत खेळी साकारली. त्याच्या आक्रमक बॅटिंगमुळे मुंबई इंडियन्सचे संपूर्ण गोलंदाजीचे तंत्र कोसळले आणि नीता अंबानी (Nita Ambani), आकाश अंबानी (Akash Ambani) यांच्या चेहऱ्यावरील प्रतिक्रिया सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
पंजाबचा नवा ‘फिनिशर’ – श्रेयस अय्यर :
पंजाब संघाला विजयासाठी 204 धावांचा डोंगर सर करायचा होता. सामन्याच्या सुरुवातीलाच सलामीवीर प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य स्वस्तात बाद झाले, तर जोस इंग्लिशही फक्त 38 धावा करून माघारी परतला.
Akash Ambani – Koi mujhe Indra Dev Ka Account Number Do…. pic.twitter.com/si8z6DIrPN
— Rishu (@lindsays06__) June 1, 2025
मात्र, या अडचणीच्या परिस्थितीत श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) संयम आणि आक्रमकतेचा संतुलित अविष्कार करत मैदान गाजवलं. त्याने केवळ 41 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 8 षटकारांसह नाबाद 87 धावांची शानदार खेळी साकारली.
Ambanis Shocked | मुंबईच्या डगआऊटमध्ये गोंधळ, अंबानी कुटुंब हादरलं :
श्रेयस अय्यरच्या (Shreyas Iyer) प्रत्येक षटकारानंतर मुंबई इंडियन्सच्या डगआऊटमध्ये शांतता पसरलेली पाहायला मिळाली. नीता अंबानी आणि आकाश अंबानी यांचे चेहरे एकदम गंभीर झाले होते. त्यांचे हावभाव कॅमेऱ्यात कैद झाले असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका क्षणाला सामन्यावर पूर्ण नियंत्रण असलेला मुंबईचा संघ, श्रेयसच्या खेळीमुळे निष्प्रभ झाला.
Most Satisfying visuals of IPL so far ????
Hit like if you also loving the meltdown of Nita Ambani
#MIvsPBKS pic.twitter.com/Z2Dm9r4nx4
— ????Che_Krishna????????????❤️ (@CheKrishnaCk_) June 1, 2025
या विजयासह पंजाब किंग्जने आपल्या संघाच्या इतिहासात प्रथमच आयपीएल फायनलमध्ये मजल मारली आहे. आता अंतिम सामना 3 जून रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणार आहे. श्रेयस अय्यरने मागील दोन संघांना फायनलमध्ये पोहोचवून दिलं होतं, आणि आता त्याच्या नेतृत्वाखाली पंजाबला ऐतिहासिक जेतेपद मिळवण्याची संधी आहे.






