तिसऱ्या श्रावण सोमवारी कोणते धान्य अर्पण करावे? जाणून घ्या शिवामूठ विधीची संपूर्ण माहिती

On: August 11, 2025 10:09 AM
Shravan Somwar 2025
---Advertisement---

Shravan Somwar 2025 | श्रावण महिना हिंदू संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यातील प्रत्येक सोमवार ‘श्रावणी सोमवार’ म्हणून भगवान शंकराच्या उपासनेसाठी विशेष मानला जातो. श्रद्धाळू या दिवशी उपवास, पूजन, जप-तप आणि विविध धार्मिक विधी करतात. विशेषतः, प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर ‘शिवामूठ’ अर्पण करण्याची परंपरा आजही जिवंत आहे.

यंदा पहिला श्रावणी सोमवार 28 जुलै रोजी पार पडला. पुढील सोमवार अनुक्रमे 4 ऑगस्ट, 11 ऑगस्ट आणि 18 ऑगस्टला येणार आहेत. प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ अर्पण केली जाते. या परंपरेला धार्मिक तसेच आध्यात्मिक महत्त्व असून, श्रद्धेने अर्पण केल्यास भगवान शिवाची कृपा लाभते, असा विश्वास आहे. (Shravan Somwar 2025)

श्रावणी सोमवारनुसार धान्यांची यादी :

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी वेगवेगळ्या धान्यांची शिवामूठ अर्पण केली जाते. या धान्यांच्या अर्पणामागे घरात सुख-समृद्धी, धन-धान्यवृद्धी आणि मानसिक समाधान मिळावे, हा उद्देश आहे.

पहिला सोमवार – 28 जुलै : तांदूळ

दुसरा सोमवार – 4 ऑगस्ट : तीळ

तिसरा सोमवार – 11 ऑगस्ट : मूग

चौथा सोमवार – 18 ऑगस्ट : जव

या नियमानुसार धान्य अर्पण केल्यास मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील अडचणी दूर होतात, अशी श्रद्धा आहे.

Shravan Somwar 2025 | शिवामूठ अर्पण करण्याची पद्धत :

श्रावणी सोमवारच्या दिवशी पूजेसाठी सर्वप्रथम महादेवासमोर दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर भस्म अर्पण करून शिवलिंगावर स्वच्छ कापड अर्पण करावे. पूजन साहित्यामध्ये बेलपत्र, धोतऱ्याची फुले, रूईची पाने, गोकर्ण फुले आणि शमीची पाने यांचा समावेश असावा. प्रथम बेलपत्र अर्पण करून इतर साहित्य क्रमाने अर्पण करावे.

नंतर नैवेद्य दाखवून उजव्या हातात शिवामूठ घेऊन त्यावर पाणी शिंपडावे आणि तीन वेळा श्रद्धेने शिवलिंगावर अर्पण करावी. शेवटी महादेवाची आरती करून पूजा पूर्ण करावी. (Shravan Somwar 2025)

श्रावण महिन्यातील सोमवारी केलेली शिवभक्ती ही आध्यात्मिक उन्नतीसाठी आणि मानसिक शांततेसाठी उपयुक्त मानली जाते. पारंपरिक श्रद्धेनुसार, या विधीमुळे जीवनात स्थैर्य, आनंद आणि समाधान वाढते.

News Title: Shravan Somwar 2025 Shivamuth List: Grains to Offer Lord Shiva for Blessings

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now