राजा रघुवंशी हत्या प्रकरणाचा धक्कादायक व्हिडीओ व्हायरल; सोनमच्या वडिलांसोबत दिसलेला राज कुशवाह

On: June 10, 2025 12:58 PM
Raja Raghuvanshi
---Advertisement---

Raja Raghuwanshi | देशभरात सध्या चर्चेत असलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडात दररोज नवनवीन आणि धक्कादायक खुलासे होत आहेत. राजाची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच तिचा प्रियकर राज कुशवाह याच्या साथीने राजा रघुवंशीची (Raja Raghuwanshi) हत्या घडवून आणली, हे यापूर्वीच समोर आले होते. आता या प्रकरणाशी संबंधित आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, जो अत्यंत धक्कादायक आहे.

या व्हिडीओमध्ये राजाच्या हत्येतील संशयित आणि सोनमचा प्रियकर राज कुशवाह हाच राजाच्या अंत्यसंस्काराला उपस्थित असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, राज कुशवाह हा त्याची प्रेयसी सोनमचे वडील देवी सिंह यांना या कठीण प्रसंगात आधार देताना दिसत आहे.

धक्कादायक व्हिडीओ समोर

मिळालेल्या माहितीनुसार, राज कुशवाह हा तोच तरुण आहे जो सोनमच्या वडिलांच्या कारखान्यात काम करायचा. तो सुमारे दीड वर्ष सोनमच्या घराजवळच राहत होता, ज्यामुळे त्याचा सोनम कुटुंबाशी घनिष्ठ संबंध होता. राजा रघुवंशीच्या हत्येप्रकरणी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात पोलिसांनी एकूण पाच संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यात राज कुशवाहचाही समावेश आहे.

राज कुशवाहचा (Raja Raghuwanshi) एक व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराच्या दिवशीचा असल्याचे म्हटले जाते. या व्हिडीओमध्ये तो देवी सिंह यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांना आधार देताना दिसतोय. सुरुवातीला अपहरणाचे वाटणारे हे प्रकरण हत्याकांडानंतर एका गंभीर वळणावर येऊन ठेपले आहे.

Raja Raghuwanshi | सोनमच्या वडिलांसोबत दिसलेला राज कुशवाह

राजा रघुवंशीच्या (Raja Raghuwanshi) हत्येच्या कटात त्याची पत्नी सोनम रघुवंशीही सहभागी असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. मात्र, सोनम स्वतःला निर्दोष सांगत असून, स्वतःच्याच अपहरणाची कहाणी पोलिसांना आणि कुटुंबीयांना सांगत आहे. अशा परिस्थितीत, राज कुशवाहाशी तिचे असलेले संबंध पोलिसांच्या तपासाचा एक महत्त्वाचा विषय बनले आहेत.

सोनमच्या वडिलांनीही मान्य केले आहे की, राज कुशवाह दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आला होता. तो सर्वांशी एकदम नेहमीप्रमाणे बोलत होता, परंतु त्यांना कल्पना नव्हती की तो या हत्येच्या कटाचा भाग असू शकतो. या व्हिडीओमुळे राज कुशवाहच्या भूमिकेवर आणखी प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, त्याच्या बोलण्यात आणि कृतीमध्ये विसंगती असल्याचे स्पष्ट दिसून येते.

News Title- Shocking Video of Raja Raghuwanshi’s Funeral

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now