राजेशाही थाटात लग्न करणाऱ्या केतनची होणाऱ्या नवरीनेच केली हत्या; कारण ऐकून पोलीसही चक्रावले!

On: June 23, 2026 1:36 PM
Ketan Agrawal Case
---Advertisement---

Ketan Agrawal Case | लोणावळ्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या मृत्यू प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सुरुवातीला हा प्रकार अपघात असल्याचे मानले जात होते. मात्र पोलिसांच्या सखोल तपासानंतर हा मृत्यू अपघाती नसून नियोजनबद्ध हत्या असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात केतन यांच्या होणाऱ्या पत्नीवर आणि तिच्या मित्रावर गंभीर आरोप करण्यात आले असून या खुलाशामुळे व्यावसायिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

लग्नाआधीच घडला थरारक प्रकार :

मृत केतन अग्रवाल (Ketan Agrawal) हे प्रसिद्ध उद्योजक विशाल अग्रवाल (Vishal Agrawal) यांचे पुत्र होते. त्यांचा विवाह मसाला व्यवसायातील नामांकित गोयल कुटुंबातील सिया गोयल (Siya Goyal) हिच्यासोबत निश्चित झाला होता. दोन प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबांतील हे लग्न असल्याने त्याची जोरदार चर्चा होती. जयपूर (Jaipur) येथे अत्यंत भव्य पद्धतीने विवाहसोहळा पार पडणार होता. पाहुण्यांच्या सोयीसाठी दोन विमानांचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती.

मात्र लग्नाच्या काही दिवस आधीच घडलेल्या घटनेने सर्वांना धक्का बसला. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत सिया गोयलला या विवाहाबाबत इच्छा नसल्याची बाब समोर आली. याच कारणामुळे तिने आपल्या एका मित्रासोबत मिळून कट रचल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. नियोजनानुसार केतन यांना लोहगड (Lohagad Fort) परिसरात नेण्यात आले आणि तेथे दरीत ढकलून त्यांची हत्या करण्यात आल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

Ketan Agrawal Case | तपासातून उघड झालेले धागेदोरे :

घटनेनंतर सुरुवातीला लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात (Lonavala Rural Police Station) अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र तपास पुढे सरकत असताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटू लागल्या. घटनाक्रमात अनेक विसंगती आढळल्याने तपास अधिक खोलवर करण्यात आला. त्यासाठी तांत्रिक विश्लेषण, कॉल डिटेल्स आणि विविध पुराव्यांची तपासणी करण्यात आली.

दरम्यान, लोहगड परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करताना पोलिसांच्या नजरेस एक संशयास्पद तरुण आला. कडक उन्हातही त्याने हुडी परिधान केली होती तसेच कानात हेडफोन असल्यामुळे त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. या व्यक्तीचा मागोवा घेतल्यानंतर तपासाला वेग आला. पुढील चौकशी आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे संपूर्ण कट उघड झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या हायप्रोफाइल प्रकरणामुळे पुणे (Pune) आणि पिंपरी-चिंचवड (Pimpri-Chinchwad) येथील व्यावसायिक क्षेत्रात मोठी चर्चा सुरू झाली असून दोन्ही संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

News Title: Shocking Twist In Ketan Murder Case

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now