…तर संतोष देशमुख वाचले असते, CID च्या तपासातून धक्कादायक खुलासा

On: January 17, 2025 1:46 PM
Shocking Revelation in Santosh Deshmukh Case
---Advertisement---

Santosh Deshmukh Case | केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Case) यांच्या हत्या प्रकरणाच्या सीआयडी तपासातून एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. संतोष देशमुख यांच्या अपहरणापूर्वीच, पवनचक्की कंपनी ‘अवादा’चे प्रोजेक्ट हेड सुनील शिंदे यांचेही अशाच प्रकारे अपहरण झाले होते. जर या पहिल्या अपहरणावर वेळीच कारवाई झाली असती, तर कदाचित संतोष देशमुख यांची हत्या टाळता आली असती, असा कयास आता बांधला जात आहे.

सुनील शिंदे यांचे अपहरण

२८ मे २०२४ रोजी, रमेश घुले आणि त्याच्या १२ साथीदारांनी मस्साजोग परिसरातून सुनील शिंदे यांचे गावठी कट्टा दाखवून अपहरण केले होते. एफआयआर कॉपीमध्ये नमूद केल्याप्रमाणे, सुनील शिंदे त्यांच्या सहकाऱ्यांसह साईटवरून केज गेस्ट हाऊसकडे जेवणासाठी जात असताना, त्यांच्या गाडीला दुसऱ्या गाडीने अडवण्यात आले. त्यातून काही लोक उतरले आणि त्यांनी गावठी कट्टा दाखवून सुनील शिंदे यांना त्यांच्या गाडीत बसवले.

खंडणीसाठी धमकी आणि हॉटेलमधील धरपकड

आरोपींनी सुनील शिंदे यांना एका हॉटेलमध्ये नेले आणि तेथील शटर बंद करून घेतले. “पवनचक्कीच्या संदर्भातील रस्त्यांचे आणि इतर कामे आम्हाला दिली नाहीत तर महागात पडेल,” अशी धमकी त्यांनी सुनील शिंदे यांना दिली. “आमच्या भागात आमच्या परवानगीशिवाय जमीन अधिग्रहण कसे करता?,” असा सवाल करत आरोपींनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली. (Santosh Deshmukh Case)

निष्काळजीपणा भोवला?

या गंभीर घटनेनंतरही, जर पोलिसांनी वेळीच पावले उचलली असती आणि आरोपींवर कारवाई केली असती, तर संतोष देशमुख यांची हत्या रोखता आली असती, असं म्हटलं जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सीआयडी करत असून, यातून आणखी काय नवीन माहिती समोर येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Santosh Deshmukh Case)

Title: Shocking Revelation in Santosh Deshmukh Case Negligence Led to the Murder

महत्त्वाच्या बातम्या-

गुगलवर चुकूनही सर्च करू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा खावी लागेल जेलची हवा

सैफला चाकूने का मारलं?, पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

ड्रेसिंग रूममध्ये काय घडलं?, गुपित उघड, गंभीरच्या आरोपाने खळबळ

‘नाशिकमधील आश्रमात…’; सरपंच हत्या प्रकरणी तृप्ती देसाईंचा खळबळजनक आरोप

‘सगळेच्या सगळे फासावर…’; सुरेश धस यांचं मोठं वक्तव्य

Join WhatsApp Group

Join Now