पुण्यातील आयटी कंपनीतील धक्कादायक वास्तव समोर; महिला कर्मचाऱ्यांचा गंभीर आरोप

On: October 4, 2025 4:21 PM
Pune IT Employee
---Advertisement---

Pune IT Employee | पुणे येथील ‘अलियनजेना कॅप्टिव्ह’ या आयटी कंपनीमध्ये कामावर अपमानास्पद वागणूक, अवास्तव कामाचा ताण, आणि वेतनवाढ मागितल्यास नोकरीतून काढून टाकण्याच्या धमक्यांसारख्या छळाला कंटाळून सहा महिला कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. मात्र, राजीनाम्यानंतरही या कर्मचाऱ्यांची अडवणूक सुरूच असून, कंपनी व्यवस्थापनाकडून त्यांना मुक्ततापत्र (Relieving Letter), अनुभव प्रमाणपत्रे, पगार पावत्या आणि फुल अँड फायनल सेटलमेंट देण्यासाठी विलंब केला जात आहे. (Aliengena Captive Pvt. Ltd)

कारवाईची मागणी :  

याबाबत कामगार उपायुक्त, पोलिस व महिला आयोगाकडे तक्रार करूनही न्याय मिळत नाही, अशी भावना या महिला कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. कंपनी सीईओ अँथनी अलियनजेना व संचालक देवेंद्र सुवासे यांच्याकडून मानसिक छळ, धमक्या देणे आणि अन्यायकारक वागणूकीमुळे कंपनी व्यवस्थापनाविरोधात कारवाईची मागणी या महिला कर्मचाऱ्यांनी केली आहे.

महिला कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर कर्मचारी आणि कंपनी व्यवस्थापनाला चर्चेसाठी बोलावले होते. मात्र, व्यवस्थापनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. नियमानुसार पुढील कारवाई केली जाईल, असे पुण्याचे कामगार उपयुक्त निखिल वाळके यांनी सांगितले.

Pune IT Employee | दररोज मानसिक छळ :

याबद्दल एका महिला कर्मचाऱ्याची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्या म्हणाल्या, राजीनाम्यानंतरही जबरदस्तीने तीन महिन्यांहून अधिक काळ काम करून घेण्यात आले. अशा प्रकारांमुळे कौटुंबिक जीवनावरही गंभीर परिणाम होत आहे. आमच्यासाठी ही नोकरी आयुष्यातील संधी होती; पण आता ती दररोज मानसिक छळ देणारी ठरली आहे. (Pune IT Employee harassment)

मुक्ततापत्र, अनुभव प्रमाणपत्रे, पगार पावत्या तातडीने मिळावेत, फुल अँड फायनल सेटलमेंटचा योग्य तो मोबदला त्वरित मिळावा आणि पुढे कोणताही छळ किंवा प्रतिशोधात्मक कारवाई होऊ नये आणि याची हमी कंपनीने द्यावी, अशी या महिला कर्मचाऱ्यांची मागणी आहे. (Aliengena Captive Pvt. Ltd News)

रूपाली चाकणकर यांची भेट घेणार :

महिला कर्मचाऱ्यांवरील अन्यायाबाबत कामगार उपायुक्त, पोलिसांसह राज्य महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली आहे. मात्र, अद्यापही कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत उद्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची भेट घेणार आहोत, असे फोरम फॉर आयटी एम्पलॉइज चे अध्यक्ष पवनजीत माने यांनी सांगितले

News title :

Join WhatsApp Group

Join Now