Gautami Patil | गौतमी पाटीलच्या चाहत्यांसाठी धक्कादायक बातमी समोर!

On: January 2, 2024 4:59 PM
Gautami patil
---Advertisement---

Gautami Patil | महाराष्ट्रात गौतमी पाटीलची चांगलीच क्रेझ आहे. दिवसेंदिवस गौतमीची फॅन फाॅलोइंग सुद्धा वाढताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसाठी गौतमी तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर कायम नवनवीन फोटो व्हिडीओ शेअर करत असते. गौतमीला छोट्या मोठ्या कार्यक्रमात अंमत्रित केलं जातं. अनेक ठिकाणी गौतमीच्या कार्यक्रमावर बंदी देखील घालण्यात आली. कार्यक्रमांसोबतच गौतमी अनेक अल्बम साँगमध्ये सुद्धा झळकली आहे.

गौतमीचा पहिला चित्रपट

गौतमीने (Gautami Patil) तिच्या नृत्यामुळे लाखो लोकांच्या मनात घर केलं आहे. तरुण, तरुणीसोबतच गौतमीसाठी पुरुष तसेच महिलावर्ग देखील फिदा आहेत. गौतमीने एका चित्रपटात देखील काम केलं आहे. घुंगरु या चित्रपटात गौतमीने मुख्य भूमिका साकारली आहे. 15 डिसेंबर रोजी हा चित्रपट रिलीज झाला होता. मात्र, हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर फार काळ टिकला नाही.

काय आहे प्रकरण?

15 डिसेंबर रोजी घुंगरु हा मराठी चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटात गौतमीने मुख्य भूमिका साकारली आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन बाबा गायकवाड यांनी केेलं आहे. गौतमीचा (Gautami Patil) हा पहिलाच चित्रपट होता. मात्र, प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.

घुंगरु चित्रपट डिसेंबरमध्ये रिलीज झाला असला तरी 7 दिवसात हा चित्रपट बाॅक्स ऑफिसवर आपटला. चित्रपटाच्या अनेक शोला प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळाली नाही. चित्रपटाचे फारसे प्रमोशनही होताना पाहायला मिळालं नाही.

काही दिवसात बॅनर उतरवण्यात आले-

घुंगरु चित्रपटाला प्रेक्षकांची ना पसंती मिळाल्यामुळे या चित्रपटाचे बॅनर देखील सात दिवसातच हटवण्यात आले आहेत. गौतमीच्या कार्यक्रमाला लाखो संख्येने प्रेक्षक येतात त्याच अशाने या चित्रपटाला येतील अशी अपेक्षा होती. पण वास्तवात चित्रपट पाहायला येणाऱ्यांची संख्या फार कमी होती.

एवढंच नव्हे तर तिच्या कार्यक्रमात अनेक वेळा वाद देखील होत असतात. गौतमीच्या अश्लील डान्समुळे तिला अनेकांनी ट्रॉल केलं होतं. नेत्यांपासून ते लहान मुलांच्या वाढदिवसापर्यंत सगळे तिला आमंत्रीत करत असल्याचं पाहायला मिळतंय.

News Title : shocking news for gautami patil fans

महत्त्वाच्या बातम्या-

Business Loan | व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार देतं ‘इतके’ लाख रूपये, असा करा अर्ज

Farmer | शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी; सरकारने घेतला मोठा निर्णय

Janhvi Kapoor चा बॉयफ्रेंडबाबत मोठा खुलासा; भर कार्यक्रमात घेतलं नाव, पाहा व्हिडीओ

Disha Salian | दिशा सालियानविषयी अंकिता लोखंडेचा मोठा खुलासा!

Maharashtra Politics | महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड!

Mrudula Jogdand

Mrudula Jogdand

Join WhatsApp Group

Join Now