राजगडावर भीषण दुर्घटना! ‘या’ कारणामुळे तरुणी दरीत पडली; पुढं घडलं भयंकर

On: October 11, 2025 2:47 PM
Rajgad Fort Accident
---Advertisement---

Rajgad Fort Accident | पुणे जिल्ह्यातील ऐतिहासिक राजगड किल्ल्यावर शनिवारच्या दिवशी भीषण अपघात घडला. फिरण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर मधमाश्यांनी अचानक हल्ला केला आणि बचावाचा प्रयत्न करताना एका तरुणीचा तोल गेल्याने ती सुमारे 40 फूट खोल दरीत कोसळली. या घटनेनंतर जवळपास नऊ तास चाललेलं धाडसी रेस्क्यू ऑपरेशन पाहून सर्वच थक्क झाले आहेत. (Rajgad Fort Accident)

मधमाश्यांच्या हल्ल्याने गोंधळ, 40 फूट दरीत कोसळली अंजली पाटील :

ही घटना राजगड किल्ल्यावरील संजीवनी माची (Sanjiwani Machi) परिसरात घडली. अंजली पाटील (वय 24) ही तरुणी मित्रांसोबत ट्रेकसाठी आली होती. अचानक झालेल्या मधमाश्यांच्या हल्ल्याने पर्यटकांमध्ये गोंधळ उडाला. त्यात अंजली घाबरली आणि बचावाचा प्रयत्न करत असताना तिचा तोल जाऊन ती 40 फूट खोल दरीत कोसळली. (Rajgad Fort Accident)

अपघातानंतर तिच्या पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली आणि मणक्याला फ्रॅक्चर झाल्याने ती हालचाल करू शकत नव्हती. घटनेची माहिती मिळताच वेल्हे पोलीस स्टेशनमार्फत वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन पथकाला कळविण्यात आलं.

Rajgad Fort Accident | अंधारात चाललेलं आव्हानात्मक रेस्क्यू ऑपरेशन :

दरीत पडलेली तरुणी बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन पथकाने अंधारातच धाडसी मोहीम राबवली. रात्रीच्या काळोखात, निसरडा उतार आणि दुर्गम परिसरात काम करणं अत्यंत कठीण होतं. मात्र, पथकातील सदस्यांनी एकजुटीने कार्य करत शेवटी अंजलीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश मिळवलं.

या मोहिमेत तानाजी भोसले यांच्या नेतृत्वाखाली वैभव भोसले, मनोज शिंदे, आकाश झोंबाडे, संजय चोरघे, संतोष जाधव, उत्तम पिसाळ, विक्रम बिरामणे आणि अनिल रेणुसे या सदस्यांचा सहभाग होता. जवळपास 8 ते 9 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अंजलीला स्ट्रेचरच्या साहाय्याने किल्ल्याच्या पायथ्याशी आणण्यात आलं.

ट्रेकर्ससाठी रेस्क्यू टीमचे महत्वाचे निर्देश :

वेल्हे प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर पाटील यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर अंजलीला पुढील उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात हलविण्यात आलं. सुदैवाने सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. या घटनेनंतर ट्रेकिंगदरम्यान सावधगिरी आणि आपत्ती व्यवस्थापनाचं महत्त्व पुन्हा अधोरेखित झालं आहे.

– ट्रेक करताना योग्य पादत्राणे, पुरेसं पाणी आणि फर्स्ट एड किट बाळगा.

– मधमाश्या, साप किंवा इतर वन्यजीव दिसल्यास घाबरू नका — शांत राहून सुरक्षित ठिकाणी जा.

– अपघात झाल्यास त्वरित वेल्हा-हवेली आपत्ती व्यवस्थापन टीमशी संपर्क साधा.

News Title: Shocking Incident on Rajgad Fort: Girl Falls 40 Feet into Gorge After Bee Attack, 9-Hour Night Rescue Mission by Velhe Team

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now