बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या पहिल्या पत्नीचा धक्कादायक खुलासा!

On: August 31, 2024 5:29 PM
Badlapur Crime
---Advertisement---

Badlapur Crime | बदलापूरच्या नामांकीत शाळेत दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेमुळं सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखला करत आरोपी अक्षय शिंदेला अटक केली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला असून दररोज धक्कादायक खुलासे समोर येत आहेत.

या प्रकरणात स्थापन करण्यात आलेल्या एसआयटीने आरोपीच्या पहिल्या पत्नीचा जबाब नोंदवला आहे. ती पालघर जिल्ह्यातील एका गावात राहत असल्याची माहिती आहे. आरोपी अक्षयचं पहिलं लग्न झाल्यानंतर त्याची ही पहिली पत्नी लग्नाच्या अवघ्या पाच दिवसात माहेरी निघून गेली होती.

अक्षयच्या पहिल्या पत्नीचा धक्कादायक खुलासा

अक्षय शारिरीक संबंधावेळी हिंसकपणे वागायचा. त्याची वृत्ती एखादा हैवान किंवा लिंगपिसाटासारखी होती. त्यामुळे लग्नाच्या पाच दिवसात मी माहेरी निघून गेले आणि पुन्हा कधीच परतले नाही, असं त्यांच्या बायकोने सांगितलं.

पाच दिवसात अक्षयची लैंगिक वासना पाहता तो कोणतंही भयंकर आणि क्रूर कृत्य करू शकतो. दरम्यान याबाबत त्याच्या विरोधात साक्ष द्यायला तयार असल्याचं तिने आपल्या जबाबात म्हटलं आहे.

बदलापूर लैंगिक (Badlapur Crime) अत्याचार प्रकरणाती आरोपी अक्षय शिंदेला ओळखपत्र नसतानाही शाळेतील आवारात आणि मुलींच्या टॉयलेटमध्ये फ्री एन्ट्री दिली जायची. कोणत्याही प्रकारची पार्श्वभूमी न तपासता आरोपी अक्षयला 1 ऑगपासून कंत्राटी पद्धतीने कामावर नेमण्यात आलं होतं.

बदलापूर प्रकरणातील (Badlapur Crime) तपासादरम्यान मिळेल्या माहितीनुसार, अक्षय शिंदे याने तीन वेळा लग्न केलं होतं. यातील पहिल्या दोन पत्नी त्याला सोडून माहेरी निघून गेल्या होत्या. तर त्याच्यासोबत राहणारी तिसरी पत्नी ही गर्भवती आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

बीएसएनएलच्या ‘या’ प्लॅननी उडवली Jio, Airtel ची झोप; कमी पैशात मिळणार बऱ्याच सेवा

तुम्ही लवकर उठता तो तुमच्या बायकोचा प्रॉब्लेम; सुप्रियाताईंनी दादांच्या डायलॉगचा घेतला समाचार

महाविकास आघाडीला महाराष्ट्रात दंगली घडवायच्यात…; शिंदे गटाच्या नेत्याचं खळबळजनक विधान

अक्षय कुमारचे तब्बल ‘इतक्या’ अभिनेत्रींसोबत होतं अफेअर, हिने तर रंगेहातच पकडलं होतं?

महिलांनो तुमच्या सुरक्षेसाठी फोनमध्ये ‘हे’ Apps लगेच डाउनलोड करा; एका क्लिकवर मिळेल मदत

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now