दत्ता गाडेचा हादरवून सोडणारा गुन्हेगारी इतिहास उघड!

On: March 3, 2025 12:59 PM
datta gade
---Advertisement---

Datta Gade | स्वारगेट (Swargate) मधील बलात्कार प्रकरणातील प्रमुख आरोपी दत्ता गाडे (Datta Gade) याला तब्बल ७० तासांच्या शोध मोहिमेनंतर पोलिसांनी शिरूर (Shirur) येथे उसाच्या शेतातून अटक केली. मात्र, या अटकेनंतर त्याच्या गुन्हेगारी इतिहासाबाबत अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत.

दत्ता गाडेचा महिलांवरील अमानुष अत्याचार उघड-

सराईत गुन्हेगार असलेल्या दत्ता गाडेने अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्यावर शारीरिक आणि मानसिक छळ केला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. शिरूर परिसरातील एका लॉजबाहेर तो सतत वावरत असे आणि तिथे येणाऱ्या महिलांचे छुप्या कॅमेऱ्याने व्हिडिओ शूट करत असे. या व्हिडिओंचा वापर करून तो महिलांना धमकवायचा आणि त्यांच्या कमकुवत जागांचा फायदा घेत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत असे.

त्याच्या या कृत्यामुळे शिरूरमधील अनेक महिला भीतीच्या छायेत होत्या. विशेषतः विवाहबाह्य संबंध असलेल्या महिलांवर तो लक्ष ठेवत असे आणि त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून त्यांचे खाजगी क्षण कॅमेऱ्यात कैद करायचा. हे व्हिडिओ सार्वजनिक करण्याची धमकी देत तो त्यांच्यावर लैंगिक संबंध ठेवण्यासाठी दबाव टाकायचा, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

ब्लॅकमेलिंगद्वारे महिलांना धमकावण्याचा-

दत्ता गाडेच्या अशा गुन्हेगारी वागणुकीमुळे पीडित महिला आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मोठा मानसिक ताण यायचा. बदनामीची भीती असल्याने कोणीही त्याच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करण्यास धजावत नव्हते. याचाच फायदा घेत गाडे अधिक हिंस्र होत गेला आणि अशा प्रकारच्या गुन्ह्यांना वारंवार अंजाम देत राहिला.

स्वारगेट अत्याचार पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात गाडेने तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्यामुळे जीव वाचवण्यासाठी तिने त्याला विरोध केला नाही, असे तिने स्पष्ट केले आहे. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध ठोस पुरावे गोळा करण्याचे काम सुरू केले आहे आणि त्याच्या इतर गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे.

News Title : Shocking Crimes of datta gade

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now