Black Magic Murder l लखनऊ (Lucknow) येथील एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे काळ्या जादूच्या (Black Magic) नावाखाली एका कपलने ८ वर्षांच्या निष्पाप मुलीचे अपहरण करून हत्या केली. हे प्रकरण दुबग्गा पोलीस स्टेशन (Dubagga Police Station) हद्दीतील असून, १ फेब्रुवारी रोजी मुलीचा मृतदेह नाल्यात कुजलेल्या अवस्थेत आढळला.
काळ्या जादूसाठी निर्दयी हत्या :
पोलिस तपासानुसार, आरोपी सोनू आणि त्याची पत्नी जुगनू (Jugnu) यांनी एका तांत्रिकाच्या सांगण्यावरून “काळ्या जादूमुळे कायम तरुण राहता येईल” या अंधश्रद्धेतून मुलीचा बळी दिला. डीसीपी पश्चिम विश्वजीत श्रीवास्तव (Vishwajeet Srivastava) यांनी सांगितले की, चौकशीदरम्यान जुगनूने स्वीकारले की, त्यांनी एका तांत्रिकाची भेट घेतली होती.
तांत्रिकाने सांगितले की, “जर तुम्ही एका मुलाचा बळी दिला, तर तुम्ही कायम तरुण राहाल.” त्यानंतर, सोनूने मुलीचे अपहरण केले, पूजा केली आणि तिला पवित्र धागा बांधल्यानंतर गळा आवळून मारले.
Black Magic Murder l हत्या करून मृतदेह नाल्यात फेकला :
निर्दयी हत्या केल्यानंतर, सोनू आणि जुगनूने मृतदेह सायकलवर बसवून नाल्यात टाकला. १ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहारा सिटी होम्स (Sahara City Homes) परिसरातील नाल्यात मुलीचा मृतदेह सापडला.
सायकलवरील दोरीमुळे पोलिसांना पुरावा मिळाला. सोनूच्या घराजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये (CCTV Footage) मुलीला जोडप्यासोबत जाताना दिसले.
घटनास्थळी पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, सोनू आणि त्याची पत्नी संशयाच्या भोवऱ्यात आले. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर जुगनूने गुन्ह्याची कबुली दिली. सोनूला पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवले असता, तो भीतीने घाबरला होता. काही वेळानंतर त्याचा मृतदेह घरी आढळला. सोनू राजस्थानचा रहिवासी, सौंदर्यप्रसाधन व्यवसायात होता. ही घटना समाजातील अंधश्रद्धेच्या (Superstition) दुष्परिणामांची भीषण उदाहरण आहे. काळ्या जादूच्या नावाखाली निष्पाप बळी जाण्याचे प्रकार थांबण्यासाठी कठोर कायद्यांची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.






