Anil Kaspatte | वैष्णवी हगवणे मृत्यू (Vaishanvi hagawane) प्रकरणात दररोज नवे नवे धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान हगवणे कुटुंबाने स्वतःची बाजू मांडत काही धक्कादायक दावे केले. मात्र, त्याच दाव्यांचं खंडन करत वैष्णवीचे वडील अनिल कस्पटे (Anil Kaspatte) यांनी पत्रकार परिषदेत मोठा गौप्यस्फोट केला आहे.
शशांक हगवणेची फॉर्च्युनर गाडीबाबत हट्टी मागणी :
हगवणे कुटुंबाच्या वकिलाने न्यायालयात सांगितले की, “आमच्याकडे 5 कोटींच्या गाड्या आहेत, त्यामुळे फक्त 40 लाखांच्या गाडीसाठी आम्ही छळ केला असं म्हणणं हास्यास्पद आहे.” मात्र अनिल कस्पटे यांनी या दाव्याचा पर्दाफाश करत सांगितलं, “त्यांच्याकडे एकच गाडी आहे आणि तीही त्यांच्या नावावर नाही. ती गाडी चंद्रकांत बुचडे यांच्या नावावर आहे.”
कस्पटे (Anil Kaspatte) पुढे म्हणाले की, “मी एमजी हेक्टर गाडी बुक केली होती, पण शशांकने ती नाकारली. तो म्हणाला, ‘मला फॉर्च्युनरच हवी, नाहीतर ती एमजी हेक्टर मी तिथेच पेटवून देईन.’ त्यामुळे नाईलाजाने मी लग्नात फॉर्च्युनर दिली.”
Anil Kaspatte | जबरदस्तीचं लग्न, मागणीचा तगादा :
अनिल कस्पटे (Anil Kaspatte) यांनी यावेळी भावनिकपणे सांगितले की, “आधीच माझ्या मुलीची दोन लग्न मोडली होती. त्यामुळे शशांकसोबतचं हे लग्न न करता पर्याय नव्हता. पण हगवणेंकडून सतत सोनं, गाडी, चांदी अशा गोष्टींच्या मागण्या होत होत्या. फॉर्च्युनर मी स्वखुशीने दिली नाही, ती मागण्यात आली होती.”
हगवणे कुटुंब सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांनी वैष्णवीच्या (vaishnavi) चारित्र्यावरही संशय व्यक्त केला आहे. मात्र, पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीप्रमाणे, वैष्णवीवर शारीरिक आणि मानसिक छळ झाला होता. अनिल कस्पटे यांनी केलेल्या खुलास्यांमुळे हगवणे कुटुंबाच्या विरोधात आरोपांचा भडका उडाला आहे.






