Maharashtra l महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. त्यामुळे राज्यात अनेक उलाढाली होत आहेत. या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. अशातच आता राज्यातील सर्वच मतदारसंघातील उमेवार जाहीर झाले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट न मिळाल्याने बंडखोरी केली आहे.
ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी :
राज्यात विधानसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेते नाराज आहेत. अशातच आता निवडणुका जवळ येताच शिवसेना उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्यात आली आहे. कारण छत्रपती संभाजीनगर या मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
मात्र किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
Maharashtra l विधानसभा निवडणुकीपूर्वी ठाकरेंनी दिला मोठा झटका :
या सर्व घडामोडीनंतर किशनचंद तनवाणी यांची पदावरून हकालपट्टी देखील करण्यात आली आहे. तर शिवसेनेचे (ठाकरे) भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची व महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील पक्षामधून हकालपट्टी करण्यात आली आहे.
मात्र आता ऐन विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे चर्चांना आता उधाण आलं आहे.
News Title – Shivsena uddhav thackeray group remove three district chiefs
महत्त्वाच्या बातम्या-
खुशखबर! ‘या’ बँकांकडून मिळतंय सर्वात स्वस्त होम लोन
शरद पवारांनी भरसभेत केली अजित पवारांच्या रडण्याची नक्कल!
निवडणुकीच्या तोंडावर आमदार गायब झाल्याने राज्यात खळबळ!
मोठी बातमी! पुण्यात महायुतीमध्ये बिघाडीला सुरवात
माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवारांकडून बडा उमेदवार मैदानात






