संतोष देशमुख हत्या प्रकरणात ठाकरे गटाने केली सर्वात मोठी मागणी!

On: January 2, 2025 3:35 PM
Shivsena
---Advertisement---

Shivsena l बीड जिल्ह्याच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राजकीय नेत्यांनी देखील लक्ष घातले आहे. कारण आता या हत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी राज्य सरकारने आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन केलं आहे. मात्र या एसआयटी पथकामधील सर्व अधिकारी बीड जिल्ह्यातीलच आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्यातच या घटनेचा सर्व तपास होणार आहे.

बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं? :

मात्र, सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या तपासावर आता विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. याशिवाय हा तपास आता बीड जिल्ह्याबाहेर करावा अशी मागणी देखील शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणातील आरोपींचे पाय खोलात जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

याशिवाय बीडमध्ये कायद्याचं राज्य नव्हतं. एक व्यक्ती सांगेल तोच कायदा, तेच प्रशासन आणि तोच निर्णय व्हायचा. त्यामुळे बीडने अनेक खून पाहिले आहेत, तसेच अनेक खून देखील पचाविले आहेत, पण संतोष देशमुखच्या खुणा नंतर जी वाचा फुटली त्यामुळे महाराष्ट्र अस्वस्थ झाला आहे. याशिवाय सरकारला देखील हालचाल करावी लागली आहे. परंतु, सरकारला असे मोठमोठे खून वाचवायचे सवय आहे असा टोला उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस सरकारला लगावला आहे.

Shivsena l देशमुख कुटुंबाला खरोखर न्याय मिळेल का? :

दरम्यान, “या हत्या प्रकरणातील आरोपींचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत असलेला वावर पाहता या प्रकरणात संतोष देशमुख कुटुंबाला खरोखर न्याय मिळेल का?”, अशी शंका देखील उपस्थित होत असल्याचं संजय राऊत म्हणाले आहेत.

याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, या हत्याप्रकरणातील कोणालाही सोडणार नाही. परंतु, फडणवीस यांनी याआधी कधी कोणाला सोडले आणि कोणाला कसं अडकवले याचा तपास करण्यासाठी एक एसआयटी नेमली पाहिजे असं देखील संजय राऊत म्हणाले आहेत.

News Title :Shivsena On santosh deshmukh murder case

महत्त्वाच्या बातम्या-

अजितदादांच्या ताफ्यामध्ये वाल्मिक कराडची गाडी! शरद पवारांच्या नेत्याचा गंभीर आरोप

भुजबळांच्या मंत्रीमंडळ एंट्रीसाठी धनंजय मुंडेंची विकेट?, बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

छगन भुजबळ भाजपमध्ये कधी प्रवेश करणार? महत्वाची माहिती समोर

सरपंच हत्ये प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले देशाबाहेर फरार?, मोठी अपडेट समोर

संतोष देशमुख हत्याप्रकरणाचा खुलासा होणार?, SIT मध्ये ‘या’ मोठ्या अधिकाऱ्यांचा समावेश

 

 

 

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now