शिंदे गटातील ‘हा’ बडा आमदार बंडाच्या तयारीत?, प्रोफाइलवरून धनुष्यबाण हटवलं

On: December 17, 2024 10:15 AM
Shivsena MLA Tanaji Sawant upset
---Advertisement---

Shivsena | महायुतीच्या मंत्रीमंडळात अनेक दिग्गजांचा पत्ता कट करण्यात आला आहे. शिवसेना पक्षातील अनेक मोठ्या नेत्यांना डावलत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नव्या चेहऱ्यांना संधी दिली. यामुळे बरेच इच्छुक आमदार नाराज झाले आहेत. शिंदे गटातील आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीच्या सध्या जोरदार चर्चा रंगत आहेत. ते लवकरच मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची कुजबूज देखील राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. (Shivsena)

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे परांडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजी सावंत यांच्या नाराजीची सध्या प्रचंड चर्चा रंगली आहे. तानाजी सावंत यांना मंत्रीमंडळात डावलल्याने त्यांचे समर्थक देखील कमालीचे संतापले आहेत. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न मिळाल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

तानाजी सावंत नाराज असल्याच्या चर्चा-

इतकंच नाही तर, या प्रकरणी परंडा येथील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तातडीची आढावा बैठक घेतली. या बैठकीत तानाजी सावंत यांना मंत्री करा, म्हणून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटून मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. आमदार तानाजी सावंत यांना मंत्रीपद न दिल्यास दोन दिवसात परंडा तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी सामूहिक राजीनामे देतील, असा इशारा देखील देण्यात आलाय. (Shivsena)

यातच त्यांनी सोशल मीडियावर देखील नाराज असल्याचं दाखवून दिलंय. आमदार तानाजी सावंत यांनी त्यांच्या फेसबुक व इतर समाज माध्यमावरील धनुष्यबाणाचे चिन्ह हटवलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो असलेला मी शिवसैनिक असं स्टेटस ठेवून त्यांनी उघड नाराजी जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढणार?

त्यामुळे तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा दिला आहे. मंत्रिपद न मिळाल्याने नाराजी असलेले तानाजी सावंत आता काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सावंत यांच्या या नाराजी नाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं देखील टेंशन वाढणार असल्याचं बोललं जातंय.

दरम्यान, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना आमदार तानाजी सावंत हे राज्याचे आरोग्य मंत्री होते. यंदाच्या मंत्री मंडळात देखील त्यांना मंत्री पद मिळण्याची आशा होती. मात्र, एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यावेळी नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं. मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेना शिंदे गटाच्या 11 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. (Shivsena)

News Title :  Shivsena MLA Tanaji Sawant upset

महत्वाच्या बातम्या –

नाराज झालेल्या छगन भुजबळांना मंत्रीपदापेक्षाही मोठं पद मिळणार?, कुणी केला दावा?

‘मंत्री करा, अन्यथा..’, ‘या’ आमदारासाठी शिंदे गटात सामूहिक राजीनाम्याची तयारी?

मोठी बातमी! सुषमा अंधारेंना जीवे मारण्याची धमकी, नागपुरात घडला धक्कादायक प्रकार

आज 12 पैकी कोणत्या राशीला मिळणार धन व समृद्धी?, वाचा राशीभविष्य

मनोज जरांगेंचा छगन भुजबळांवर थेट हल्लाबोल! जरांगे काय म्हणाले?

Join WhatsApp Group

Join Now