विमानात जशा ‘हवाई सुंदरी’ तशाच आता ST बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

On: October 2, 2024 8:21 AM
Shivneri Bus Hostesses in st shivneri bus 
---Advertisement---

Shivneri Bus Hostesses | केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वीच ईलेक्ट्रिक बसमध्ये हवाई सुंदरीप्रमाणे बस सुंदरी असणार, असं वक्तव्य केलं होतं. आता याबाबत महाराष्ट्र शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता एसटी महामंडळाच्या ई-शिवनेरी बसमध्ये ‘शिवनेरी सुंदरी’ असणार आहे. शिवसेना नेते भरत गोगावले यांची एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी निवड होताच त्यांनी या निर्णयाची घोषणा केली. (Shivneri Bus Hostesses)

शिवनेरी बसमध्ये दिसणार ‘शिवनेरी सुंदरी’

सध्या या निर्णयाची जोरदार चर्चा आहे. तर, विरोधी गटाकडून या निर्णयाची खिल्ली उडवली जात आहे. “मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिवारिक (शिवनेरी सुंदरी) नेमण्यात येणार आहे. प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल, अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे.”, अशी माहिती भरत गोगावले यांनी दिली. (Shivneri Bus Hostesses)

एसटी महामंडाळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष भरत गोगावले महामंडळाच्या 304 व्या बैठकीत बोलते होते. यावेळी त्यांनी हा निर्णय घोषित केला. या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन त्याला मान्यता देण्या आली. त्यापैकीच मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी ‘शिवनेरी सुंदरी’ नेमण्यात येणार असल्याच्या निर्णयाला मान्यता मिळाली.

आनंद आरोग्य केंद्र

याचसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील स्वर्गीय आनंद दिघे स्मरणार्थ एसटी 343 बस स्थानकांवर ‘आनंद आरोग्य केंद्र” या नावाने दवाखाना सुरू करण्यात येणार आहे. याद्वारे अत्यंत माफक दरान बस स्थानकांवरील प्रवाशांबरोबरच आसपासच्या सर्व नागरिकांना कमी दरामध्ये विविध आरोग्य चाचण्या आणि औषधे एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

आरोग्य केंद्रासाठी संबंधित संस्थांना बस स्थानकांवरील 400 ते 500 चौ.सेमी.ची जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या संस्था आरोग्य तपासणी दवाखाना, पैथोलॉजी, लॅब, औषध दुकान सुरू करून सेवा पुरवतील. यामुळे नागरिकांना कमी दरात विविध आरोग्य चाचण्या व औषधे एकाच छताखाली उपलब्ध होतील. (Shivneri Bus Hostesses)

बस स्थानकावर महिला बचत गटांना स्टॉल उघडण्यास जागा मिळणार

तसेच, एस.टी.महामंडळाच्या प्रत्येक बस स्थानकांवर त्या परिसरातील महिला बचत गटांना आपले स्थानिक पदार्थ विक्री करण्यासाठी चक्रीय पद्धतीने नाममात्र भाडे आकारुन 10 X 10 आकाराचा स्टॉल उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासोबतच नवीन 2500 साध्या बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू करणे तसेच 100 डिझेल बसेसचे प्रायोगिक तत्त्वावरील इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणे अशा विविध विषयांना या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे. (Shivneri Bus Hostesses)

News Title :  Shivneri Bus Hostesses in st shivneri bus 

महत्वाच्या बातम्या –

आज सर्वपित्री अमावस्या ‘या’ राशींसाठी ठरणार शुभ?, वाचा तुमचं राशीभविष्य

अजित पवारांना मोठा धक्का; ‘हा’ बडा नेता तुतारी फुंकणार

“रोहित पवार शरद पवारांचा पुढील वारसा..”, सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

राज्य सरकार लाडक्या बहिणींना विकत घेणार का?; काँग्रेसच्या महिला खासदाराचा थेट सवाल

लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली देवाला सुद्धा…

Join WhatsApp Group

Join Now