Sanjay Raut Health Update | शिवसेना (ठाकरे गट) चे खासदार संजय राऊत यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. राऊत यांची तब्ब्येत बिघडल्यामुळे त्यांना उपचारासाठी भांडूप येथील फोर्टिस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसांपासूनच त्यांच्या आरोग्याविषयी चर्चांना उधाण आले होते. आता त्यांच्या आरोग्याच्या ताज्या घडामोडीमुळे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये आणि समर्थकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे.
संजय राऊत यांच्या प्रकृतीत गेल्या काही दिवसांपासून बिघाड झाल्याची माहिती त्यांनी स्वतः काही दिवसांपूर्वीच दिली होती. मात्र, आज पुन्हा एकदा त्यांच्या तब्बेतीत समस्या निर्माण झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.
संजय राऊत प्रकृती अस्वास्थ्यामुळे हॉस्पिटलमध्ये :
मिळालेल्या माहितीनुसार, संजय राऊत (Sanjay Raut Health Update) हे गेल्या काही दिवसांपासून सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर आहेत. त्यांच्या आरोग्याशी संबंधित नियमित तपासणीसाठी ते आज फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. राऊत यांच्यावर प्राथमिक वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतर त्यांना विश्रांतीसाठी भांडूप येथील त्यांच्या मैत्री निवास्थानी हलविण्यात येणार आहे.
या पार्श्वभूमीवर राऊत यांच्या समर्थकांकडून त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली जात आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत वैद्यकीय बुलेटिन अद्याप समोर आलेले नाही, मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या तब्बेतीत हळूहळू सुधारणा होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
Sanjay Raut Health Update | प्रकृती अस्वास्थ्यावर राऊत यांचे पत्रक :
गेल्या काही दिवसांपूर्वी संजय राऊत (Sanjay Raut Health Update) यांनी स्वतः एक पत्रक जारी करून आपल्या आरोग्याची माहिती दिली होती. त्यात त्यांनी म्हटले होते, “माझ्या प्रकृतीत काही गंभीर स्वरूपाचा बिघाड झाल्याचे निदर्शनास आले आहे, मात्र उपचार सुरू आहेत आणि मी लवकरच पूर्णपणे बरा होईन.”
या पत्रकानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः संजय राऊत यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. त्याचप्रमाणे राज्यातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही राऊत यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. राऊत यांनी आपल्या पत्रकात पुढे नमूद केले होते की, “वैद्यकीय सल्ल्यानुसार मला गर्दीत जाणे आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे टाळावे लागणार आहे, पण मी लवकरच आपल्या भेटीस येईन.”
राजकीय क्षेत्रात नेहमीच निर्भीड वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे संजय राऊत यांच्या प्रकृतीविषयीची ही बातमी आता राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे.






